क्रीडा

VIDEO: मीराबाई चानू परतली मायदेशी; असं झालं दिल्ली एअरपोर्टवर स्वागत

विनायक होगाडे

नवी दिल्ली : जगातील मानाची क्रिडा स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. 49 किलो वजनी गटात तिने दुसऱ्या दिवशीच भारताच्या पदकाचे खाते उघडले. तिने स्नॅच प्रकारासह क्लिन आणि जर्कमध्ये मिळून 202 किलो वजन उचलत रौप्य पदकाची कमाई केली. या कामगिरीसह चानूने 21 वर्षांनंतर वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवून दिले. मिराबाईच्या या दैदिप्यमान यशाबाबत तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मिराबाई नुकतीच भारतात परतली असून दिल्ली विमानतळावर तिच्या मोठ्या दिमाखदार पद्धतीने स्वागत करण्यात आलं आहे. या स्वागताचा व्हिडीओ ANI या वृत्तसंस्थेने दिला आहे.

यावेळी ट्विट करत मीराबाईने म्हटलंय की, अत्यंत प्रेमाच्या वर्षावात आणि भरघोस अशा पाठिंब्यामध्ये मायदेशी परतणं आनंददायी आहे. खूप खूप आभार!

वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात तिने पहिल्याच दिवशी पदक पटवण्याचा पराक्रमही आपल्या नावे नोंदवला. कौतुकाच्या वर्षावासह तिच्यावर आता बक्षीसांचा वर्षाव सुरु झालाय. मनिपूर राज्य सरकारने तिला 1 कोटी रुपये रोख बक्षीस देणार असल्याची घोषणा केलीये. मनिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी यासंदर्भातील घोषणा केली. देशाला पहिले पदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचे त्यांनी अभिनंदनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT