ravi dahiya  
क्रीडा

World Wrestling Championship : ऑलिम्पिक विजेत्या दाहियाचीही माघार

पुढील आठवड्यापासून रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या ट्रायल्स सुरु होणार आहेत.

सुशांत जाधव

World Wrestling Championship : जगातील मानाच्या स्पर्धेत भारताची मान अभिमानाने उंचावणाऱ्या आणखी एका पैलवानाने जागतिक अजिंक्य कुस्ती स्पर्धेतून माघार घेतलीये. कांस्य पदक विजेत्या बजरंग पुनिया पाठोपाठ ऑलिम्पिक स्पर्धेत चंदेरी कामगिरी करणाऱ्या रवी दाहियाने (ravi dahiya) स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पुढील आठवड्यापासून रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या ट्रायल्स सुरु होणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने दाहियाने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. ट्रायल्सची सुरुवात मंगळवारपासून होणार असून ही स्पर्धा नॉर्वेतील ओस्लो येथे 2 ऑक्टोबरपासून पार पडणार आहे.

या निर्णयासंदर्भात दहियाने म्हटले आहे की, कोणत्याही तयारीशिवाय मला मॅटवर उतरायचे नाही. सराव न करता आखाड्यात उतरण्याला काहीच उपयोग नसतो. त्यामुळेच मी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतलाय. दाहियाने स्पर्धेतून माघार घेतली असली तरी डब्ल्यूएफआयने आयोजित केलेल्या ट्रायल्ससंदर्भात त्याने समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या बाजूने त्यांनी योग्य निर्णय घेतलाय, असे मत त्याने व्यक्त केले.

ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या बजरंग पुनियाने देखील जागतिक अजिंक्य स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो स्पर्धेला मुकणार असल्याचे आधीच समोर आले होते. त्यानंतर आता ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता रवि दाहिया देखील स्पर्धेत उतरणार नसल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT