Olympic  sakal
क्रीडा

Olympics : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रतेची अखेरची संधी

आगामी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा आणि चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित करण्यासाठी या खेळाडूंना ही शेवटची संधी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा व राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अविनाश साबळे हे दोन प्रमुख खेळाडू सोडल्यास भारतातील जवळ-जवळ सर्व प्रमुख ॲथलिट उद्या, गुरुवारपासून भुवनेश्वर येथे सुरू होत असलेल्या सिनिअर आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होत आहेत. आगामी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा आणि चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित करण्यासाठी या खेळाडूंना ही शेवटची संधी आहे. त्यामुळे सर्वच जण झोकून देऊन कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील.

नीरज सध्या तुर्कीमध्ये; तर अविनाश अमेरिकेत सराव करीत आहे. त्यांना महासंघाने या स्पर्धेतून सूट दिली आहे; मात्र पॅरिस डायमंड लीगमध्ये तिसरे स्थान मिळविणारा श्रीशंकर मुरली, भालाफेकपटू अणू राणी आणि शंभर मीटर हर्डल्स शर्यतीत राष्ट्रीय विक्रम करणारी ज्योती यराजी यांना स्पर्धेत भाग घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार हे तिघेही भुवनेश्वर येथे दाखल झाले आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल, तर आंतरराज्य स्पर्धेत भाग घ्यावाच लागेल, असा नियम केल्याने हे खेळाडू येत आहे. यामुळे श्रीशंकर मुरली हा या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण राहणार आहे. त्याची मुख्य लढत जेस्वीन अल्ड्रिनसोबत राहणार आहे. जेस्वीनने गेल्या वर्षी श्रीशंकरचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढताना ८.४२ मीटरचा नवीन विक्रम केला होता.

ज्युनिअर आशियाई विजेती रेझोना मलिक, फेडरेशन करंडक विजेता प्रिया मोहन, गेल्या वर्षीची जागतिक ज्युनिअर स्पर्धेतील ब्राँझपदक विजेती रुपल चौधरी, महाराष्ट्राची ऐश्वर्या मिश्रा, हरियानाची अंजली देवी, चार वर्षाच्या बंदीनंतर परतणारी निर्मला शेरॉन व हिमांशी मलिक यांचा सहभाग असल्याने चारशे मीटरची शर्यत वेगवान होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे २८ खेळाडू

महाराष्ट्राचे २८ खेळाडू सहभागी होत असून, त्यात संजीवनी जाधव, कोमल जगदाळे, ऐश्वर्या मिश्रा, आशा खतुआ, पूर्वा सावंत, सर्वेश कुशारे, तेजस शिरसे, प्रकाश गदाडे यांच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे. याशिवाय प्रांजली पाटील, प्रकाश गदाडे, आर्यन कदम, रोहन कांबळे, निर्मल यादव या महाराष्ट्राच्या खेळाडूंना वाइल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT