Zeeshan Maqsood  ICC Twitter
क्रीडा

ओमानच्या कर्णधाराची कमाल; पहिल्याच लढतीत विक्रमी 'चौका'

ओमानचा कर्णधार झीशान मकसूदनं 16 व्या षटकात एक धाव खर्च करून या एकाच षटकात तीन फलंदाजांना तंबूत धाडले.

सुशांत जाधव

Oman vs Papua New Guinea, 1st Match, Group B : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ओमानच्या कर्णधाराने विक्रमी कामगिरी करुन दाखवली. घरच्या मैदानावर पापुआ न्यू गिनी विरुद्धच्या क्वॉलिफायर लढतीत नाणेफेक जिंकून ओमान कर्णधार झीशान मकसूद (Zeeshan Maqsood) याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन षटकातच ओमानच्या कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पापुआ न्यू गिनीला सुरुवातीच्या दोन षटकात दोन धक्के बसले. यावेळी त्यांच्या धावफलकावर एकही धाव नव्हती.

पापुआ न्यू गिनीचा कर्णधार असद वला आणि चार्ल्स अमीनी या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागादीरी करुन संघाचा डाव सावरला. पण ही जोडी माघारी फिरल्यानंतर पापुआ न्यू गिनीला ठराविक अंतराने धक्क्यावर धक्के बसत राहिले. ओमानचा कर्णधार झीशान मकसूदनं 16 व्या षटकात एक धाव खर्च करून या एकाच षटकात तीन फलंदाजांना तंबूत धाडले. 18 व्या षटकात त्याने सामन्यातील चौथी विकेट घेतली.

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत एका डावात चार विकेट घेणारा तो दुसरा कर्णधार ठरलाय. यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार डेनियल विटोरी याने अशी कामगिरी केली होती. 2007 मध्ये रंगलेल्या पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचे नेतृत्व करताना विटोरीने भारताविरुद्धच्या सामन्यात 20 धावा खर्च करुन 4 विकेट घेतल्या होत्या. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ओमनच्या कर्णधाराने 20 धावांत 4 विकेट घेत खास विक्रम आपल्या नावे केला.

पापुआ न्यू गिनीचा कर्णधार असद वला 56, चार्ल्स अमीनी 37 आणि सेसे बाऊ 13 धावा वगळता अन्य कोणत्याही दुहेरी आकडा पार करता आला नाही. परिणामी ओमानच्या गोलंदाजीसमोर पापुआ न्यू गिनी संघाला निर्धारित 20 षटकात 9 बाद 129 धावांपर्यंत मजल मारता आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad: मोठी बातमी! आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार? एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश

IPL 2027 Update: बेधडक षटकार खेचणारा 'भिडू' Mumbai Indians चा नवा बॅटिंग कोच; संपूर्ण सपोर्ट स्टाफ बदलला... माजी सहकाऱ्यांची फौज मैदानावर उतरवली; कोण आहे ते?

IND vs PAK: भारत पाकिस्तान सामना आज; किती वाजता सुरू होणार? कुठे पाहता येणार LIVE?

Uttarakhand: 'वारसा मोहीम' ठरली वरदान; मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ४,९४३ वारस नोंद प्रकरणांचा जलद निपटारा!

“आपल्याला बाळ होणार?” राजवाडेंच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याची एंट्री होणार? स्वानंदीच्या हातात टेस्ट किट पाहून समरचा खुश; प्रोमो Viral

SCROLL FOR NEXT