Javed Miandad banter with Kiran More in World Cup 1992  esakal
क्रीडा

World Cup 1992 : पाकच्या 'माकड' उड्यांना 30 वर्षं पूर्ण

सकाळ डिजिटल टीम

4 March World Cup 1992 : बरोबर 30 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान (India And Pakistan) हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी 1992 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भिडले होते. नेहमीप्रमाणे हा सामना खूप उत्कंठावर्धक झाला होता. मात्र या सामन्यात एक किस्सा घडला होता. भारताचा विकेट किपर किरण मोरे (Kiran More) आणि पाकिस्तानचा स्टार फलंदाज जावेद मियांदाद (Javed Miandad) यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते. ही घटना क्रिकेट इतिहासात अजरामर झाली आहे. जे व्हा केव्हाही पाकिस्तान आणि भारताच्या सामन्यातील वादग्रस्त घटनांचा उल्लेख होतो त्यावेळी ही घटना पहिल्यांदा आठवली जाते.

भारताचे विकेटकिपर (Indian wicketkeeper) किरण मोरे यांना विकेटच्या मागून काही ना काही बडबडत राहण्याची सवय होती. तसेच त्यांची अपिल देखील जोरदार असायची. तो अपिल करताना उड्या मारायचे. दुसरीकडे पाकिस्तानच्या जावेद मियांदाद यांना क्रिकेटच्या मैदानावर काही अतरंगी गोष्टी करण्याची खोड होती. 1992 च्या वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) गोलंदाजी करत होता. त्यावेळी सचिन तेंडुलकरचा एक चेंडू जावेद मियांदाद यांच्या पॅडवर जाऊन आदळला. त्यावेळी विकेटच्या मागे असणाऱ्या किरण मोरेने जोरदार अपिल केली. मात्र अंपायरने ही अपिल फेटाळून लावली. मात्र मोरेंची ही जोरदार अपिल मियांदाद यांच्या डोक्यात गेली होती.

याच षटकात जावेद मियांदादना किरण मोरे यांनी पुन्हा एकदा धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न देखील फसला. त्यावेळी मियांदाद यांनी विकेटवर माकड उड्या मारण्यास सुरूवात केली. त्यांनी खरं तर किरण मोरेंची नक्कल करण्याच्या प्रयत्न केला होता. हा किस्सा क्रिकेट इतिहासात (Cricket History) अजरामर झाला. आजही लोक या घटनेचा व्हिडिओ पाहून हसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT