west indies  sakal
क्रीडा

OTD: आजच्याच दिवशी वेस्ट इंडिजनं घडवला होता इतिहास, 10 तास चालली मॅच

लॉर्ड्स वर अंधुक झालेल्या प्रकाशातच ९ः३० च्या सुमारास विश्‍वकरंडक उंचावला

Kiran Mahanavar

विश्वकप करंडक प्रत्येक देशाला आपल्या देशाची नाव मोठे करून देणारे हे स्पर्धा. पहिली विश्‍वकरंडक स्पर्धा जरी १९७५ सुरू झाली असले तरी १९१५ ला जागतिक स्पर्धा खेळण्याचा प्रयत्न इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी केला होता. परंतु काही प्रमाणात हा प्रयत्न फसला नंतर काही वर्षांनंतर योगायोगाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मर्यादित षटकांचा सामना झाला. तेथेच विश्‍वकरंडक स्पर्धेचे बीज रोवले गेले...!

पहिली विश्‍वकरंडक स्पर्धा इंग्लंड मध्ये आयोजित केली. त्याकाळी कसोटी मध्ये दर्जा ६ संघ म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि दर्जा नसलेले २ पूर्व आफ्रिका आणि श्रीलंका असे ८ देश खेळले. विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी एकाही मर्यादित षटकांचा सामना न खेळलेला भारत त्या स्पर्धेत सलामीचा सामना खेळण्याची संधी मिळाली. भारताच्या नसानसात भिनलेली कसोटी क्रिकेट इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात ३३४ धावांच्या आव्हाना समोर १३२ वर ३ बाद धावा करता आल्या. त्या वेळी अनेक विक्रम नावावर असलेल्या सुनील गावसकर यांनी संपुर्ण ६० षटके खेळून नाबाद ३६ धावांचा विक्रम केला. (On This Day west Indies Won World Cup 1975)

१९७५ च्या स्पर्धेत सहभागी ८ पैकी ४ संघ उपान्त्य फेरीत पोचले. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड-वेस्ट इंडीज असे सामने ठरले. त्यामध्ये इंडीज ने न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया ने इंग्लंड ला हरवुन विश्‍वकरंडक स्पर्धेत फायनल मध्ये प्रवेश केला. विश्‍वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना २१ जून रोजी लंडनच्या लॉर्ड्स मध्ये खेळला गेला.

वेस्ट इंडीज ने पहिले फलंदाजी करताना २९१ धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने २७४ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाचे १० पैकी ५ फलंदाज धाव बाद झाले. अशा रंगतदार झाला होता की सामना इंग्लंड स्थानिक वेळेनुसार रात्री ८ः४५ पर्यंत गेला होता. सुदैवाने त्या वेळी काळोख पडला नव्हता. वेस्ट इंडिजने - ऑस्ट्रेलियाचा पराभव करीत विश्वविजेता होण्याचा मान मिळविला. लॉर्ड्स वर अंधुक झालेल्या प्रकाशातच ९ः३० च्या सुमारास विश्‍वकरंडक उंचावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT