p.v. sindhu sakal
क्रीडा

P. V. Sindhu : आशियाई स्पर्धेत सिंधूकडून अपेक्षा नको

आत्मविश्‍वास गमावल्याचे विमलकुमार यांचे मत

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - यंदाच्या आंतरराष्ट्रीय मोसमात सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सिंधूचा आत्मविश्‍वास कमी झाला आहे. त्यामुळे तिच्याकडून आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याच्या आशा बाळगू नका, असे मत माजी प्रशिक्षक विमलकुमार यांनी व्यक्त केले.

पी. व्ही. सिंधू हिला मागील वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर दुखापतीला सामोरे जावे लागले. त्यानंतर तिला पाच महिने बॅडमिंटनपासून दूर राहावे लागले, पण दुखापतीमधून बरे होऊन पुनरागमन केल्यानंतर तिला बॅडमिंटन कोर्टवर प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या आठवड्यात बंगळूरमधील प्रकाश पडुकोण अकादमीत सराव केला. विमलकुमार याप्रसंगी म्हणाले, मी व प्रकाश पडुकोन यांनी तिचा सराव जवळून बघितला. प्रकाश यांनी तिला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.

तिचे प्रशिक्षक मुहम्मद हाशीम यांच्याशीही संवाद साधला; मात्र यादरम्यान तिच्या आत्मविश्‍वासात कमतरता आल्याचे दिसून आले. त्यामुळे आशियाई स्पर्धेमध्ये तिच्याकडून मोठ्या अपेक्षा करता येणार नाहीत, असे विमलकुमार सांगतात.

तांत्रिक बाबींमध्ये सुधारणेची गरज विमलकुमार यांनी पी. व्ही. सिंधूच्या खेळाबाबत म्हटले, की सिंधू एक दिग्गज खेळाडू आहे. तिचा सराव बघितल्यानंतर समजले, की तिला तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. तिला पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी वेळही लागू शकतो.

गेल्या आठवड्यात तिने प्रकाश पडुकोन अकादमीत सराव केला, ही तिच्यासाठी चांगली बाब आहे. कारण विविध प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेतल्यास खेळामध्ये सुधारणा होऊ शकते, असे विमलकुमार यांना वाटते.

सिंधूची यंदाच्या मोसमातील कामगिरी ,सात स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत,कॅनडा ओपनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल,यूएस ओपन व ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

SCROLL FOR NEXT