Rohan Bopanna  sakal
क्रीडा

Rohan Bopanna : रोहन बोपण्णाकडून पेसची बरोबरी ; नऊ एटीपी मास्टर्सची फायनल गाठण्याचा पराक्रम

भारताचा ४४ वर्षीय अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा याने महान खेळाडू लिएंडर पेसच्या विक्रमाची बरोबरी केली. बोपण्णा याने मॅथ्यू एब्डेन याच्या साथीने मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

सकाळ वृत्तसेवा

मियामी (अमेरिका) : भारताचा ४४ वर्षीय अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा याने महान खेळाडू लिएंडर पेसच्या विक्रमाची बरोबरी केली. बोपण्णा याने मॅथ्यू एब्डेन याच्या साथीने मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत अंतिम फेरीत प्रवेश केला. याचसोबत नऊ एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा बोपण्णा हा लिएंडर पेसनंतरचा दुसरा भारतीय टेनिसपटू ठरला हे विशेष.

रोहन बोपण्णा - मॅथ्यू एब्डेन जोडीने उपांत्य फेरीच्या लढतीत मार्सेल ग्रॅनोलर्स - होरासियो झेबालोस या जोडीवर ६-१, ६-४ असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जेतेपदाच्या लढतीत बोपण्णा- एब्डेन जोडीसमोर क्रोएशियाचा इवान डोडिग व अमेरिकेचा त्याचा साथीदार ऑस्टीन क्रॅझीकेक यांचे आव्हान असणार आहे.

दरम्यान, याआधी रोहन बोपण्णा याला दुबई अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत, तर इंडियन वेल्स स्पर्धेत अंतिम ३२ फेरीत हार पत्करावी लागली. त्यामुळे त्याची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली, पण मियामी टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यामुळे बोपण्णा याला पुन्हा पहिल्या स्थानावर पोहोचता येणार आहे.

येत्या सोमवारी क्रमवारीत बदल होतील. तेव्हा बोपण्णा पुरुषांच्या दुहेरीत पहिल्या स्थानावर असणार आहे.रोहन बोपण्णा याने गेल्या काही वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एटीपी मास्टर्स १००० या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची त्याची १४ वी खेप होय. तो पहिल्यांदाच मियामी टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. एटीपी टूअर स्पर्धांमध्ये त्याने ६३ वेळा अंतिम फेरी गाठली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT