Babar Azam Sakal
क्रीडा

PAK vs AUS : 145 वर्षांत कुणाला जमलं नाही ते बाबरनं करुन दाखवलं

सकाळ डिजिटल टीम

PAK vs AUS 2nd Test: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कराची कसोटीत नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याने दमदार खेळीसह आपले नाव दिग्गज क्रिकेटर्सच्या पंक्तीत का घेतले जाते, याची झलकच दाखवून दिलीये. बाबरने सामन्याच्या अखेरच्या दिवशी 196 धावांची खेळी केली. त्याचे द्विशतक अवघ्या 4 धावांनी हुकले. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 506 धावांचा पाठलाग करताना हा एकटा गडी ऑस्ट्रेलियाला पूरन उरला.

पाकिस्तान संघाने मंगळवारी 2 बाद 192 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. अब्दुल्लाल शफीक 96 धावांवर परतल्यानंतर बाबर आझमने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याचे द्विशतक हुकले असली तरी एक खास रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला आहे. 145 वर्षांच्या कसोटी इतिहासात जे घडलं नाही ते बाबरनं करुन दाखवलं.

बाबर आझम कसोटी सामन्याच्या इतिहासात चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. याआधी हा रेकॉर्ड मायकल अथर्टन (185*), बेवेन कोंगडोन (176), डोनाल्ड ब्रॅडमॅन (173*) नावावर होता. याशिवाय रिकी पाँटिंगसोबत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावे झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT