क्रीडा

PAK vs NEP Asia Cup : नेपाळ पहिल्यांदाच आशिया कपसाठी मैदानात! पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला हा निर्णय

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Pakistan vs Nepal : आजपासून आशिया कपच्या 16व्या आवृत्तीला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेपाळचा सामना यजमान पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नेपाळचा संघ प्रथमच पाकिस्तानशी कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. दोन्ही संघांना आशिया कप स्पर्धेत अ गटात ठेवण्यात आले आहे. यामध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम नाणेफेक झाल्यानंतर म्हणाला, आम्ही आधी फलंदाजी करू. खेळपट्टी खूपच कोरडी दिसत आहे. आम्ही प्रथम प्लेइंग इलेव्हन घोषित केले. यामागे कोणतेही मोठे कारण नव्हते, ते फक्त खेळाडूंना आत्मविश्वास देण्यासाठी होते.

नेपाळचा संघ प्रथमच आशिया कप खेळत आहे. याचा संदर्भ देत कर्णधार रोहित पौडेल म्हणाला की, सर्वजण आनंदी आहेत. आशिया कपमधील हा आमचा पहिला सामना आहे. नेपाळमधील प्रत्येक व्यक्ती या सामन्यासाठी उत्सुक आहे. इथे अनेक गोष्टी नेपाळसारख्या आहेत. फलंदाजीच्या दृष्टीने खेळपट्टी चांगली दिसत आहे.

विशेष म्हणजे नेपाळचा हा आशिया कपमधील पदार्पण सामना आहे. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पण पाकिस्तानविरुद्ध विजयाची नोंद करणे सोपे नसेल. नेपाळकडे चांगली गोलंदाजी असली तरी. संदीप लामिछाने हा अनुभवी गोलंदाज आहे. तो संघासाठी एक्स फॅक्टर बनू शकतो.

प्लेइंग इलेव्हन -

  • पाकिस्तान : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

  • नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरे, गुलसन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT