PAK vs NZ 1st T20 Match 
क्रीडा

PAK vs NZ: पाकिस्तानसमोर न्यूझीलंड संघाने टाकल्या नांग्या, अवघ्या 6 धावांत 5 गमावल्या विकेट अन्...

पाकिस्तानने न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

Kiran Mahanavar

PAK vs NZ 1st T20 Match : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी रात्री लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने 88 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पाकिस्तानने प्रथम खेळून 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाहुण्या किवी संघ अवघ्या 94 धावांत सर्वबाद झाला.

पाकिस्तानसाठी या सामन्यात वेगवान गोलंदाज हरिस रौफने चमकदार कामगिरी केली. रौफने 3.3 षटकात अवघ्या 17 धावा देत चार विकेट घेतल्या. तत्पूर्वी फलंदाजी करताना युवा सैम अय्युबने 28 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 47 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याचवेळी फखर जमाननेही 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या.

पाकिस्तानने दिलेल्या 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर चाड बोवेस 1 आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज विल यंग 2 धावा करून बाद झाले. त्यानंतर डॅरिल मिशेल 11 आणि कर्णधार टॉम लॅथम 20 हेही पॅव्हेलियनमध्ये परतला.

मार्क चॅपमनने यानंतर काही फटके खेळले आणि जेम्स नीशमनेही 2 चौकार आणि 1 षटकार मारला. पण दोघेही फार काळ टिकू शकले नाहीत. नीशम 8 चेंडूत 15 धावा करून बाद झाला तर चॅपमनने 27 चेंडूत 34 धावा केल्या. न्यूझीलंडच्या 88 धावांत पाच विकेट्स होत्या, पण त्यानंतर पाहुण्या संघाने अवघ्या सहा धावांत आपले उरलेले पाच विकेट गमावले आणि संपूर्ण संघ अवघ्या 94 धावांत सर्वबाद झाला.

पाकिस्तानकडून हारिस रौफने 3.3 षटकात केवळ 17 धावा देत चार विकेट घेतल्या. याशिवाय इमाद वसीमला दोन तर शाहीन आफ्रिदी, जमान खान, फहीम अश्रफ आणि शादाब खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT