PAK vs NZ ODI New Zealand ODI Squad For Pakistan Tour Announced  
क्रीडा

PAK vs NZ: आयपीएलमुळे PCB नाराज! पाकविरुद्ध ODI मालिकेसाठी न्यूझीलंडची घोषणा पण किवी स्टार भारतात...

Pakistan vs New Zealand ODI: न्यूझीलंडचे अनेक स्टार खेळाडू पाकिस्तानात जाणार नाहीत याला कारण...

Kiran Mahanavar

PAK vs NZ ODI : पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडने वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. पाच सामन्यांची मालिका 26 एप्रिलपासून सुरू होणार आहे. टॉम लॅथम किवी संघाचे नेतृत्व करेल. न्यूझीलंडचे अनेक स्टार खेळाडू पाकिस्तानात जाणार नाहीत. याला कारण आहे आयपीएल.

टीम साऊथी, लॉकी फर्ग्युसन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर आणि फिन ऍलन या लीगमध्ये खेळल्यामुळे पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाहीत. केन विल्यमसनही आयपीएलमध्ये खेळत होता, मात्र दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे. (Latest Marathi News)

न्यूझीलंड संघात स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे पाकिस्तानातील स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो. टॉम लॅथम व्यतिरिक्त किवी संघात डॅरिल मिशेल, मॅट हेन्री, जेम्स नीशम, हेन्री निकोल्स आणि इश सोधी या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.

15 सदस्यीय संघात बेन लिस्टर आणि कोल मॅककॉन्की या दोन नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही खेळाडूंना पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

संघाच्या घोषणेनंतर न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, यावर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार असून या मालिकेद्वारे खेळाडूंना तयारीसाठी मोठी मदत मिळणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यानंतर 5 टी-20 सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे.

न्यूझीलंड एकदिवसीय संघ : टॉम लॅथम, टॉम ब्लंडेल, चॅड बोवेस, मॅट हेन्री, बेन लिस्टर, कोल मॅककॉन्की, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, हेन्री शिपले, ईश सोधी, ब्लेअर टिकनर आणि विल यंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT