babar azam, virat kohli esakal
क्रीडा

बाबर आझमच्या शतकी वादळात ‘विराट’चे रेकॉर्ड ब्रेक

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम वनडे कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज बनला

धनश्री ओतारी

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) वनडे कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. असा कारनामा करणारा पाकिस्तानचा क्रिकेटर पहिलाच फलंदाज ठरला आहे.

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना बुधवारी 8 जून रोजी मुल्तान (Multan) क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान बाबर आझमने ही कामगिरी केली आहे. बुधवारच्या सामन्यापूर्वी बाबरला कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी 98 धावांची गरज होती आणि त्याच्याकडे चार डावांची संधी होती.

मात्र, पहिल्याच एकदिवसीय सामन्यात आजमने कोहलीला मागे टाकले. पाकिस्तानचा एकदिवसीय कर्णधार म्हणून 13 डावांमध्ये 27 वर्षीय खेळाडूने 91.36 च्या सरासरीने आणि 103.71 च्या स्ट्राइक रेटने सहा शतके आणि 3 अर्धशतकांसह 1005 धावा केल्या आहेत.

शतकी खेळीसह बाबर आजमने इतिहास रचत वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा शतकांची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. बाबरचे वनडे क्रिकेटमधील हे सलग तिसरे शतक आहे. वेस्ट इंडिजपूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग शतके झळकावली होती. त्याच वेळी, त्याने 2016 मध्ये कॅरेबियन संघाविरुद्ध तीन वेळा सलग 100 हून अधिक धावा करताना शतकांची हॅटट्रिक केली होती.

जानेवारी 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेदरम्यान कोहलीने त्याच्या 17व्या डावात हा पराक्रम केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT