Imad Wasim Announces Retirement From International Cricket 
क्रीडा

वर्ल्ड कप संपल्यानंतर अष्टपैलू खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती! सोशल मीडियावर दिली माहिती, म्हणाला...

Kiran Mahanavar

Imad Wasim Announces Retirement From International Cricket : वर्ल्ड कप संपल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी निवृत्ती जाहीर केली. इमाद बराच काळ संघाबाहेर होता. कदाचित त्यामुळेच त्यांनी निवृत्तीची घोषणा केली असावी.

इमाद वसीमने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी बऱ्याच दिवसांपासून निवृत्तीचा विचार करत होतो. आता निवृत्तीची योग्य वेळ आहे.

इमाद वसीमने त्याच्या एक्स अकाऊंटवरून ट्विट केले आणि लिहिले की, “अलिकडच्या काळात, मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल खूप विचार करत आहे. आणि मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याची हीच योग्य वेळ आहे. नव्या प्रशिक्षकाच्या आगमनाने पाकिस्तान क्रिकेट संघाने भविष्यात चांगली कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे. संघाची चमकदार कामगिरी पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. माझे कुटुंब आणि मित्रांचे आभार ज्यांनी मला सर्वोच्च स्तरावर पोहोचण्यास मदत केली.

इमादने या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानसाठी शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात तो 14 चेंडूत 31 धावा करून धावबाद झाला. याशिवाय त्याने 2 बळीही घेतले. 2020 मध्ये तो शेवटचा वनडे खेळला.

आत्तापर्यंत इमादने पाकिस्तानसाठी एकूण 55 एकदिवसीय आणि 66 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने अनुक्रमे 986 आणि 486 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 5 अर्धशतके आहेत. तर त्याला एकही शतक झळकावता आले नाही. गोलंदाजी करताना त्याने एकदिवसीय सामन्यात 44 आणि टी-20 मध्ये 65 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT