Pakistan Asad Shafiq Announces Retirement Marathi News sakal
क्रीडा

Cricket News : 'आता क्रिकेट खेळताना पूर्वीसारखी मज्जा...' दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती

Kiran Mahanavar

Pakistan Asad Shafiq Announces Retirement : पाकिस्तानी संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 14 डिसेंबरपासून तीन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. बाबर आझमच्या जागी शान मसूदला पाकिस्तानी कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

दरम्यान, पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानच्या अनुभवी कसोटीपटू असद शफीकने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.

निवृत्तीची घोषणा करताना असद शफीक काय म्हणाला?

कराची व्हाईट्सला नॅशनल टी-20 चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद मिळवून दिल्यानंतर पत्रकार परिषदेत तो म्हणाला, 'मला आता क्रिकेट खेळताना पूर्वीसारखी मज्जा येत नाही आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी फिटनेसची पातळीही पहिल्या सारखी राहिली नाही. त्यामुळेच मी क्रिकेटाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

असद पुढे म्हणाला की, मला बोर्डाकडून करारनामा मिळाला असून मी त्याकडे लक्ष देत आहे. त्यावर मी लवकरच सही करेन. वहाब रियाझ यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा भाग झाल्यावर तो पाकिस्तानसाठी कोणत्या प्रकारचा संघ निवडतो हे पाहणे बाकी आहे.

असदने 2010 ते 2020 दरम्यान पाकिस्तानसाठी 77 कसोटी सामन्यांमध्ये 4660 धावा केल्या, ज्यात 12 शतके आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 60 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामनेही खेळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

Pune Fraud : अघोरी विधीच्या नावाखाली पुण्यात तरुणीची सव्वातीन लाखांची फसवणूक

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT