India vs Pakistan 
क्रीडा

Ind vs Pak : पाकिस्तानचं पितळ उघडं पडलंय! या कारणांमुळे भारताविरुद्ध पराभव पक्का

पाकिस्तानी संघ अशा काही अडचणींनी घेरला आहे ज्यामुळे....

Kiran Mahanavar

India vs Pakistan T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. 2021 च्या विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने टीम इंडिया या सामन्यात उतरणार आहे. गेल्या वर्षी शाहीन आफ्रिदी, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी मिळून भारताकडून सामना हिसकावून घेतला होता. यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार सराव करत आहेत. मात्र सराव सामन्यात पाकिस्तानला जोरदार झटका बसला असून त्याची तयारी उघड झाली आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाने आपली ताकद दाखवून दिली आहे.

पाकिस्तानी संघाने ज्या पद्धतीने सराव सामना खेळला ते पाहिल्यानंतर टीम इंडियाविरुद्ध विजय पक्का मानला जात आहे. पाकिस्तानी संघ अशा काही अडचणींनी घेरला आहे ज्यामुळे भारताविरुद्ध तो खूपच कमकुवत दिसत आहे.

पाकिस्तानची मिडल ऑर्डर फ्लॉप

आशिया चषकापासून पाकिस्तानच्या मिडल ऑर्डरची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. आता टी-20 विश्वचषक सुरू झाला आहे आणि पाकिस्तानी मधल्या फळीतील फलंदाज सुधरण्याचे नाव घेत नाहीत. खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद यांची कामगिरी अत्यंत खराब आहे त्यामुळे पाकिस्तानी संघ त्रस्त आहे.

पाकिस्तानी गोलंदाजीही कमकुवत

पाकिस्तानची गोलंदाजी ही त्याची ताकद असल्याचे सांगितले जात होते, मात्र आता त्यातही अनेक समस्या दिसू लागल्या आहेत. शाहीन आफ्रिदीच्या पुनरागमनाने पाकिस्तानचा उत्साह निश्चितच वाढला आहे, परंतु इतर वेगवान गोलंदाजांची कामगिरी फारच खराब आहे. मोहम्मद हसनैन, शाहनवाज डहानी, नसीम शाह यांचा इकॉनॉमी रेट खूपच खराब आहे. शादाब खानचा गोलंदाजीचा फॉर्मही चिंतेचा विषय आहे.

पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण अत्यंत खराब

पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाची पातळीही खूपच खालावली आहे. सराव सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी दोन सोपे झेल सोडले. हारिस रौफनेही सहज धावबाद होण्याची संधी गमावली. टी-20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खराब क्षेत्ररक्षण हे कोणत्याही संघाच्या पराभवाचे कारण असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT