PCB esakal
क्रीडा

PCB घेणार मोठा निर्णय; अफ्रिदी होणार निवड समितीचा अध्यक्ष

न्यूझीलंडविरुद्धच्या होम सीरिजनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही मोठे बदल होणार

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीबाबत पीसीबी लवकरच मोठी घोषणा करू शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या होम सीरिजनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे पीसीबीच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Pakistan Cricket Board May Continue With Shahid Afridi As Chief Selector )

मिळालेल्या माहितीनुसर, मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर या महिन्याच्या अखेरीस आपल्या पदावर कायम राहायचे की नाही याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरिम मुख्य निवडकर्ता शाहिद आफ्रिदी आपल्या कार्यकाळाबद्दल मोठी घोषणा करू शकतो. आफ्रिदीने सुरुवातीला केवळ न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेसाठी जबाबदारी स्वीकारली होती परंतु आता तो पूर्णवेळ भूमिकेचा विचार करत आहे.

IND vs SL 1st ODI: एकही रुपया पण खर्च करण्याची गरज नाही; येथे पहा सामना 'फ्री'

शाहिद आफ्रिदीच्या निवडक खेळाडूंची न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी पाहिल्यानंतर आता पीसीबीने अनेक निर्णय बदलले आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, “शाहिद आफ्रिदीने पीसीबी प्रमुख नजम सेठी यांच्याशी याबद्दल चर्चा केली आहे. त्याने यापूर्वी आफ्रिदीला केवळ कार्यकारी मुख्य निवडकर्ता म्हणून राहण्यास सांगितले होते. मात्र आता ही मुदत वाढवण्यासाठी दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.

Abhijit Katke: 'हिंदकेसरी'चा मानकरी अभिजीत कटके आहे तरी कोण?

आगामी दोन मोठ्या स्पर्धांबाबत पीसीबी हा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. एक म्हणजे ५० षटकांचा आशिया कप आणि दुसरा या फॉरमॅटमध्ये खेळला जाणारा विश्वचषक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT