Pakistan Cricket Board suspended one of its national level coaches alleged sexual molested Women Cricketer esakal
क्रीडा

PCB ने राष्ट्रीय कोचला केले निलंबित; महिला क्रिकेटपटूचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप

अनिरुद्ध संकपाळ

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकाला निलंबित केले. त्याच्यावर महिला खेळाडूचे शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुल्तान भागातील नदीम इक्बाल असं या कोचचं नाव असून तो एक प्रसिद्ध माजी वेगावान गोलंदाज होता. ज्या संघाकडून वकार युनिस खेळायचा त्याच संघाकडून नदीमने देखील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दरम्यान, पीसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून नदीमने बोर्डाच्या कराराचा भंग केल्याचे आढळून आले आहे. (Pakistan Cricket Board suspended one of its national level coaches alleged sexual molested Women Cricketer)

पीसीबी अधिकारी म्हणाले की, 'आम्ही कोणतीही फौजदारी चौकशी करू शकत नाही ते पोलिसांचे काम आहे. मात्र आम्ही केलेल्या चौकशीत नदीमने बोर्डाच्या कराराचा भंग केल्याचे आढळून आले आहे.' 50 वर्षाच्या नदीमने 80 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेट वर्तुळात वकारपेक्षा नदीम चांगला गोलंदाज असल्याचे मानले जात होते. त्याने कराची येथील एका सामन्यात नॅशनल बँकेच्या संघाला 20 धावात गाशा गुंडळायला लावला होता. त्यावेळी त्याने सात विकेट घेतल्या होत्या.

दरम्यान, पीडितेने नदीमविरूद्ध पोलिसात तक्रार केली आहे. त्यात तिने काही वर्षांपूर्वी ज्यावेळी ती पीसीबी महिला ट्रायल्ससाठी मुल्तानला गेली होती त्यावेळी नदीम तेथील एक प्रशिक्षक होता. पीडितेने सांगितल्याप्रमाणे 'नदीम महिला संघात निवड करण्याचे आश्वासन देऊन माझ्याशी जवळिक वाढवली. याचबरोबर त्याने बोर्डात मला नोकरी देण्याचेही आश्वासन दिले. दरम्यानच्या काळात त्याने माझा लैंगिक छळ केला. याचबरोबर त्यांच्या मित्रांनी देखील माझा छळ केला. त्याच्याकडे माझा व्हिडिओ देखील आहे तो दाखवून मला तो ब्लॅकमेल देखील करत होता.'

2014 मध्ये पाच युवा महिला क्रिकेटपटूंनी मुल्तान क्रिकेट क्लबच्या अधिकाऱ्यांवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. पीडित क्रिकेटपटूने माध्यमांना सांगितले की, प्रसिद्ध क्रिकेट क्लबमधील हे अधिकारी जिल्हा क्रिकेट असोसिएशनशी सल्लग्नित आहेत. त्यांनी निवड करण्याच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT