Salman Butt Selector PCB Controversy esakal
क्रीडा

Salman Butt Selector : 'सल्लागार' सलमान बट बाबत खेळ झाला; पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतर पीसीबीचा यू टर्न

अनिरुद्ध संकपाळ

Salman Butt Selector PCB Controversy : पाकिस्तान क्रिकेटमध्ये वर्ल्डकपनंतर मोठे बदल होत आहेत. कर्णधार, प्रशिक्षकांपासून निवडसमितीपर्यंत सर्वच स्तरावार जोरदार हालचाली सुरू आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सलमान बटला शुक्रवारी निवडसमिती अध्यक्ष वहाब रियाजचा सल्लागार म्हणून नियुक्त केलं होते.

मात्र मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात जेलची हवा खाणाऱ्या बटला पद मिळाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी आकाश पाताळ एक केलं यानंतर पीसीबीने यू टर्न घेतला. पाकिस्तानच्या काळजीवाहू पंतप्रधानांना देखील यात हस्तक्षेप करावा लागला.

अखेर पंतप्रधानांनी केला हस्तक्षेप

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक काकर हे पीसीबीचे पॅटरन इन चीफ देखील आहेत. त्यांच्या कार्यालयातून अधिकृतरित्या सांगण्यात आलं आहे की, पंतप्रधानांनी निवडसमितीत वादग्रस्त खेळाडू सलमान बटला समाविष्ट करण्याच्या निर्णयावर कडक कारवाई केली आहे. पंतप्रधानांनी हा निर्णय रद्द केला आहे.

पाकिस्तानात प्रतिभाशाली खेळाडूंची कमतरता नाही. क्रिकेट सारख्या खेळातील निवड समिती ही वादापासून दूर असली पाहिजे. पीएमनीं पीसीबीमध्ये हस्तक्षेप करत फक्त स्वच्छ चरित्र असलेल्या लोकांनाच सिलेक्शन कमिटीत स्थान देण्यास सांगितले आहे.

वहाबला देखील नको हाता सलमान बट

पाकिस्तानचा निवडसमिती अध्यक्ष वहाब रियाजने देखील वक्तव्य केलं होतं की त्याला सलमान बट सोबत काम करायचं नाहीये. प्रेस कॉन्फरन्समध्ये तो म्हणाला होता की, मी सलमान बट सोबत बोललो आहे आणि त्याला सांगितलं आहे की तू माझ्या टीमचा सदस्य होऊ शकत नाहीस. आपलं दोघांच नाव एकत्र जोडलं जावं असं मला नको आहे. पीसीबी अध्यक्ष झाका अश्रफ यांनी मला माझी टीम निडवण्याचा हक्क दिला आहे.

रियाजने यावेळी भारतीय खेळाडू मोहम्मद अझहरूद्दीन आणि अजय जडेजा यांचे देखील उदाहरण दिलं. भारतातील अझहरूद्दीन आणि अजय जडेजा यांचे देखील उदाहरण पाहा. ते देखील क्रिकेटमध्ये काम करत आहेत. अझहरूद्दीन हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. अजय जडेजा अफगाणिस्तानचे बॅटिंग कोच आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT