asif afridi esakal
क्रीडा

अफ्रिदीची चिमुकली देतेय मृत्यूशी झुंज; सोशल मीडियातून मागितली दुऑं

धनश्री ओतारी

पाकिस्तानचा क्रिकेटर आसिफ अफरिदी मोठ्या संकटाला तोंड देत आहे. त्याची नन्ही परी रुग्णालयात असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. त्याने तिचा रुग्णालयातील फोटो शेअर करत त्याने मदतीची विनंती केली आहे.

आसिफ अफरीदी आपल्या नन्ह्या परीचा रुग्णालयात अॅडमिट असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने, 'कृपया माझी मुलगी लवकरात लवकर बरी होण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा' असा भावूक मेसेज त्याने सर्वांना केला आहे.

या ट्विटनंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू उमर गुल आणि सलमान बट पुढे आले आहेत. त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या दोन्ही माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी चिमुकलीसाठी प्रार्थनादेखील केली.

35 वर्षीय असिफला अद्याप पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघातून खेळण्याची संधी मिळालेली नाही. 2009 मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

ऑलराऊंडर आसिफ अफरीदी हा पाकिस्तान सुपर लीग २०२२ मध्ये मुल्तान सुल्तान संघाचा हिस्सा होता. या सत्रादरम्यान त्याने ५ सामन्यात कमालीची गोलंदाजी करत ८ विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी २० सीरीजमध्ये पाकिस्तानने त्याला संघात स्थान दिले होते. मात्र, तो प्लेइंग इलेव्हनचा हिस्सा बनू शकला नाही. त्याला मोहम्मद नवाज जागी स्थान दिले होते.

आसिफ आफ्रिदी शेवटचा पाकिस्तानमधील लिस्ट-ए स्पर्धेत खैबरकडून खेळला होता. यादरम्यान तो गोलंदाजीत यशस्वी ठरला. त्याने सामन्यांमध्ये सातत्याने विकेट्स घेतल्या. याशिवाय अर्धशतक झळकावण्यातही तो यशस्वी ठरला. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत आसिफ पाकिस्तान संघाचा भाग नाही. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 8 जून रोजी मुलतान येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT