Wasim Akram Waqar Younis Praise Suryakumar Batting esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : जाए तो जाएं कहा! सूर्याचे 'तडाखे' पाहून पाकचा माजी गोलंदाज हतबल

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav T20 World Cup 2022 : भारताने झिम्बाब्वेचा पराभव करत टी 20 वर्ल्डकप 2022 ची सेमी फायनल गाठली. भारताच्या ग्रुपमधून पाकिस्तान देखील सेमी फायनलमध्ये दाखल झाला आहे. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघाच्या चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान फायलनमध्ये पुन्हा भिडणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, पार्श्वभुमीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसिम अक्रम आणि वकार युनिस यांनी भारताचा स्टार परफॉर्मर सूर्यकुमार यादवसाठी कौतुकाचे पुल बांधले आहेत.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनल सामन्यापूर्वीच्या चर्चेत बोलताना वसिम अक्रमकने सूर्यकुमारचे तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला, 'मला वाटते की तो (सूर्यकुमार यादव) दुसऱ्याच ग्रहावरून आला आहे. तो इतरांपेक्षा खूप वेगळा फलंदाज आहे. त्याने खोऱ्याने धावा केल्या आहे. तो 2022 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. त्याला फलंदाजी करताना पाहणे पर्वणीच असते. त्याची फक्त झिम्बाब्वेविरूद्ध नाही तर जगातील टॉप क्लास गोलंदाजांसमोरही त्याच पद्धतीने खेळतो.'

अक्रम पुढे म्हणाला की, 'तो न घाबरणारा फलंदाज आहे. चेंडू लागला तरी घाबरायचं नाहीये. या मुलाची फलंदाजी पाहताना मजा येते.' यानंतर याच चर्चेत अपस्थित असलेला वकार युनिस म्हणाला की, 'गोलंदाजांनी जायचं तर जायचं कुठं?' सूर्यकुमार यादव सध्या टी 20 क्रिकेट आयसीसी रँकिंगिमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघ सूर्याकडून सेमी फायनल आणि फायनलमध्ये देखील अशाच प्रकारची कामगिरी करण्याची अपेक्षा करत असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT