Pakistan Former Captain Wasim Akram Will Debut In Film Through MBG Thriller Film esakal
क्रीडा

Wasim Akram: वसिम अक्रमलाही लागले 'हिरोगिरी'चे वेड; MBG चित्रपटाद्वारे करणार पदार्पण

अनिरुद्ध संकपाळ

Wasim Akram Film Acting Debut : पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम आक्रमने मैदानावर आपल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवली होती. आता हाच वेगवान गोलंदाज मोठ्या पडद्यावर देखील धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. वसिम अक्रमला MBG नावाच्या एका चित्रपटासाठी साईन करण्यात आले आहे. या चित्रपटाचा एक जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रसारित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये अक्रमची देखील झलक पहायला मिळते. निवृत्तीनंतर अक्रम सहसा समालोचन करतानाच दिसला आहे.

अक्रम ज्या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे त्या चित्रपटाचे नाव 'मनी बॅक गॅरेंटी' असं आहे. या चित्रपटात अक्रम दमदार भुमिकेत दिसणार आहे. अक्रम सोबतच पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेता फवाद खान, फेसल कुरेशी, मिकाल जुल्फकारी, दावेश शेख, हीना दिलपाजीरो आणि उमरीसह अनेक कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट चोरीच्या घटनेसंदर्भात असल्याचे दिसते. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे शूटिंग पाकिस्तान आणि थायलंडमध्ये झाले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे 2023 ला प्रदर्शित होणार आहे.

वसिम अक्रमने पाकिस्तानकडून 104 कसोटी आणि 356 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत अक्रमने 2.59 च्या सरासरीने 414 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 25 वेळा पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तर 5 वेळा सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेमध्ये अक्रमने पाकिस्तानसाठी 502 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT