Pakistan lose 2 WTC points fined Marathi news 
क्रीडा

AUS vs PAK: पराभवानंतर पाकिस्तानला आणखी दोन मोठे धक्के! ICC ने दंड ठोठावला अन्...

Kiran Mahanavar

Australia vs Pakistan Test : पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानला आणखी दोन मोठे धक्के बसले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ACC) सामन्यातील स्लो ओव्हर रेटसाठी पाकिस्तान संघावर कारवाई केली आहे.

मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्याव्यतिरिक्त, ICC ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​मधून दोन गुण देखील कापले आहेत. पर्थमध्ये पाकिस्तानला 360 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

पहिली कसोटी गमावल्यानंतर पाकिस्तानची WTC गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली होती. पेनल्टीमुळे पाकिस्तानचे पॉइंट्स आता 66.67 वरून 61.11 झाले आहेत. भारत 66.67 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

ICC आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, दिलेल्या वेळेच्या पुढे प्रत्येक षटकासाठी 5 टक्के दंड आकारला जाईल. त्याच वेळी, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप प्लेइंग कंडिशनच्या कलम 16.11.2 नुसार, प्रत्येक षटक कमी टाकल्याबद्दल संघाला एक गुण दंड आकारला आहे.

पाकिस्तानने निर्धारित वेळेत दोन षटके कमी टाकल्याने एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने ही शिक्षा स्वीकारली. मसूदची कर्णधार म्हणून ही पहिलीच कसोटी मालिका आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेळला जाईल, जो कसोटी बॉक्सिंग डे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Bears: ४ अस्वलांचा पिकअपमध्ये धुमाकूळ! स्नॅक्स अन् बिअरचे कॅन पळवले! VIDEO पाहून हसू आवरणार नाही

'क्रिकेटशी मस्ती नाही...', आचरेकर सरांची तीन महत्त्वाची वाक्य कोणती? अमोल मुजुमदारांचा खुलासा; हरमनप्रीतला म्हटलं Best Captain

Pune Hinjawadi Metro Line 3 Inauguration : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो!

Marathi News Live Updates : दिल्लीत १ नोव्हेंबरला काँग्रेस आणि भाजप आमनेसामने; रामलीला मैदानावर 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, तर भाजपचेही जोरदार शक्तीप्रदर्शन

शाळेत घुसून दहावीच्या दोन मुलींवर करवतीने हल्ला; एकीची प्रकृती गंभीर, आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT