Asif Ali injured T20 World Cup  esakal
क्रीडा

Asif Ali : पाकला मोठा धक्का! मॅच फिनिशने वर्ल्डकपपूर्वी सोडले मैदान

अनिरुद्ध संकपाळ

Asif Ali injured T20 World Cup : पाकिस्तानने ट्रायसिरीजच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळे येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास दुणावला असणार. मात्र पाकिस्तानच्या मालिका जिंकण्याच्या आनंदावर फायनल सामन्यावेळी पाणी फिरले. पाकिस्तानचा मधल्या फळीतील अव्वल फलंदाज आसिफ अलीला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. आसिफ अली हा पाकिस्तानचा मॅच फिनिशन म्हणून ओळखला जातो. वर्ल्डकपच्या तोंडावर पाकिस्तानचा अव्वल खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे.

ट्राय सिरीजच्या अंतिम सामन्यात ज्यावेळी न्यूझीलंड फलंदाजी करत होती त्यावेळी ही घटना घडली. मोहम्मद वासिम टाकत असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेवॉन कॉनवॉयने ऑफ साईडला स्क्वेअर ड्राईव्ह मारला. दरम्यान, चेंडू बाऊंडरी लाईनच्या पार जाण्यापासून रोखण्यासठी आसिफ अलीने डाईव्ह मारला मात्र त्याला चेंडू थांबवता आला नाही. यादरम्यान, आसिफ अलीच्या गुडघ्याला दुखापत झाली.

चौकार वाचवताना आसिफ अलीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. तो बाऊंडरी लाईनवरच वेदनेने कळवळत पडला होता. दरम्यान, पाकिस्तानची फिजिओ टीम त्वरित मैदानावर धावली. त्यांनी आसिफ अलीवर उपचार करण्यास सुरूवात केली. मात्र या उपचारांनी फारसा काही उपयोग झाला नाही. अखेर आसिफ अलीला ड्रेसिंग रूमध्ये नेण्यात आले. आसिफ अलीची दुखापत किती गंभीर आहे याबाबतची माहिती अजून मिळालेली नाही.

पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदी नुकताच गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला आहे. मोहम्मद वासिम देखील दुखापतग्रस्त झाला होता. मात्र तो दुखापतीतून सावरला असून तो संघात देखील सामील झाला आहे. दरम्यान, शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या संघासोबत वर्ल्डकपच्या सराव सामन्यादरम्यान जोडला जाणार आहे. हे दोन खेळाडू दुखापतीतून सावरत असतानाच पाकिस्तानच्या अजून एका खेळाडूला दुखापत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT