Pakistan ODI World Cup 2023 squad announced Naseem Shah misses out 
क्रीडा

Naseem Shah : 'माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही...' वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाहची पोस्ट व्हायरल

Kiran Mahanavar

Pakistan ODI World Cup 2023 squad announced Naseem Shah : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी एकदिवसीय वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली. आशिया कप स्पर्धेत खेळलेल्या दोन खेळाडूंना या संघातून वगळण्यात आले आहे. नसीम शाह दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी हसन अली संघात आला आहे.

वेगवान गोलंदाज फहीम अश्रफच्या जागी लेगस्पिनर उसामा मीरचा संघात समावेश करण्यात आला आहे. आशिया कपमध्ये भारताविरुद्ध हरिस रौफला दुखापत झाली होती, मात्र तो तंदुरुस्त झाला आहे. याच सामन्यात नसीम शाहला दुखापत झाली होती.

नसीम शाहला शस्त्रक्रिया करावी लागणार असून तो पुढील तीन-चार महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहणार आहे, असे पीसीबीच्या वैद्यकीय पथकाने म्हटले आहे. यादरम्यान वर्ल्डकप संघातून वगळल्यानंतर नसीम शाहची सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे.

नसीम शाहने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मी खुप जड अंतःकरणाने सांगत आहे की, मी माझ्या प्रिय देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या अद्भुत संघाचा भाग नसणार आहे. मी खूप निराश आहे पण मला विश्वास आहे की सर्व काही अल्लाहच्या हातात आहे, इंशाअल्लाह मी लवकरच मैदानात परतेन. माझ्या सर्व चाहत्यांनी प्रार्थना केल्याबद्दल त्यांचे आभार.

आयसीसी वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ -

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक, फखर जमान, सलमान अली आगा, हरिस रौफ, मोहम्मद नवाज, सौद शकील, मोहम्मद वसीम जूनियर, अब्दुल्ला शफीक , इफ्तिखार अहमद, हसन अली, उसामा मीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT