ramiz raja esakal
क्रीडा

Ramiz Raja: वाचाळवीर रमीझ राजाची हकालपट्टी! कोणाला मिळाली PCB चेअरमनपदाची खुर्ची ?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा बदल....

Kiran Mahanavar

Pakistan Cricket Board : रमीझ राजा यांच्या जागी नजम सेठी (Najam Sethi) यांची पीसीबीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयाला पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी मान्यता दिली आहे. रमीझ राजा 2021मध्ये पीसीबीचे प्रमुख झाले होते. नजम सेठी यांनी यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी नजम सेठी यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अध्यक्षपदी नियुक्ती आणि सध्याचे रमीझ राजा यांना हटवण्यास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान कार्यालय लवकरच या नियुक्तीबाबत अधिसूचना जारी करेल. 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाने बहुमत मिळविले तेव्हा नजम सेठी यांनी पीसीबी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि 1992 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रमीझ राजा यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी PCB चे 36 वे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली होती.

आशिया कप 2023 पाकिस्तानात होणार आहे. तेव्हा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आशिया चषक तटस्थ ठिकाणी होणार असल्याचे सांगितले होते. पण यानंतर रमीझ राजाने धमकीचे विधान केले की जर टीम इंडिया पाकिस्तान आशिया चषक खेळण्यासाठी आली नाही तर पाकिस्तानही वनडे वर्ल्ड कपमध्ये भाग घेण्यासाठी भारतात जाणार नाही. मात्र आता खुद्द रमीझ राजा यांनाही खुर्ची वाचवता आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: अमित शाह लोणीमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT