PM Imran Khan esakal
क्रीडा

'T20 विश्वचषकात पंतप्रधानांमुळेच पाकिस्तानची जबरदस्त कामगिरी'

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानात (Pakistan) सरकार आणि तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे.

इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकिस्तानात (Pakistan) सरकार आणि तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे. कट्टरपंथी नेत्याच्या सुटकेसह चार मागण्यांसाठी टीएलपीनं इस्लामाबादमध्ये मोर्चा काढलाय. यावरती भाष्य करताना, सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह (CM Murad Ali Shah) यांनी काल (सोमवारी) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांची चांगलीच खिल्ली उडवलीय. तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानच्या (टीएलपी) कार्यकर्त्यांनी केलेलं निदर्शन हाताळण्यात सरकार अयशस्वी ठरलं असून या हल्ल्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागलाय. इम्रान खान हे देशाचे पंतप्रधान होण्यापेक्षा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होण्यासाठी अधिक योग्य असल्याचा हल्लाबोल शाह यांनी केलाय. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलताना शाह पुढे म्हणाले, टीएलपी निषेधाचा मुद्दा हाताळण्यात पाकिस्तान सरकार अयशस्वी ठरलं असून या हल्ल्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागलाय. आतापर्यंत झालेल्या संघर्षात 11 टीएलपी कार्यकर्ते, आठ पोलिस आणि 19 नागरिकांनी आपला जीव गमावलाय. तर 300 हून अधिकजण जखमी झाले आहेत.

पंतप्रधानांची खिल्ली उडवत शाह म्हणाले, यूएईमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात इम्रान खान यांच्यामुळेच पाकिस्तान क्रिकेट संघ चमकदार कामगिरी करत आहे, असं मी ऐकलंय. त्यामुळं पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकारण सोडून पुन्हा 'क्रिकेट'कडे परत जावं, असा सणसणीत टोलाही शाह यांनी पंतप्रधानांना लगावलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT