Pakistan squad for World Cup 2023 announced sakal
क्रीडा

Pakistan Squad World Cup 2023 : वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! आशिया कपमधील 3 खेळाडू बाहेर

WC 2023: पाकिस्तानचा संघ जाहीर

Kiran Mahanavar

Pakistan squad for World Cup 2023 announced : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय वर्ल्डकप 2023 साठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. माजी कर्णधार आणि मुख्य निवडकर्ता इंझमाम उल यांनी संघाची घोषणा केली.

वेगवान गोलंदाज नसीम शाहला संघात स्थान मिळालेले नाही. आशिया कप 2023 दरम्यान दुखापत झाली होती. नसीमच्या जागी हसन अलीला वर्ल्डकप संघात स्थान देण्यात आले आहे.

संघाची घोषणा करताना मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक म्हणाले की, गेल्या काही दिवसांत आमचे खेळाडू अधिक सामने खेळले आहेत. गेल्या एक वर्षापासून खेळत असलेल्या खेळाडूंनाच आम्ही संघात स्थान दिले आहे. आशिया कप-मध्ये आम्ही फक्त 2 खराब सामने खेळलो.

अशा परिस्थितीत प्रत्येकाने संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली पाहिजे. पण आमचे गोलंदाज मधल्या षटकांमध्ये विकेट घेत नाहीत. ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. संघ व्यवस्थापन याकडे लक्ष देत आहे.

वर्ल्डकप 2023 साठी पाकिस्तानचा संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.

राखीव : मोहम्मद हरिस, जमान खान, अबरार अहमद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

Alegaon Paga Murum Scam: आलेगाव पागा पाझर तलावातील कथित अवैध मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती? पर्यावरणप्रेमींची वरिष्ठ चौकशी व फेरपंचनाम्याची मागणी

Sillod Farmer: पीक कर्ज, पाण्याअभावी वाळलेले पीक; सिल्लोड तालुक्यात ३० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

SCROLL FOR NEXT