Pakistan In Semi Final  esakal
क्रीडा

Pakistan In Semi Final : 300 धावा केल्या तर इंग्लंडला... पाकिस्तानला सेमी फायनल गाठण्यासाठी हे दिव्य पार करावं लागणार

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan In Semi Final : वर्ल्डकप 2023 मध्ये गुणतालिकेत चौथा क्रमांक पटकावून सेमी फायनल गाठण्यासाठी न्यूझीलंडने आपली दावेदारी प्रबळ केली आहे. मात्र असं असलं तरी न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये अजून अधिकृतरित्या पोहचलं नाही कारण पाकिस्तानला अजून सेमी फायनल गाण्याची संधी आहे. मात्र ही संधी त्यांना मोठं दिव्य पार केल्यानंतरच मिळणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानला हे शिवधनुष्य पेलवेल असे वाटत नाही.

गतविजेत्या इंग्लंडसोबत पाकिस्तानचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना होणार आहे. इंग्लंड जरी सेमी फायनलमधून आधीच बाहेर गेला असला तरी ते सध्या आपल्या अत्मसन्मानसाठी खेळत आहेत. त्यांना गमावण्यासारखं आता काही राहलेलं नाही. त्यामुळे ते फिअरलेस क्रिकेट खेळणार हे नक्की. हेच पाकिस्तानसमोरचं मोठं आव्हान असणार आहे.

पाकिस्तान सेमी फायनल गाठण्यासाठी इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात आधी नाणेफेक जिंकावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना कोलकात्यात होणाऱ्या सामन्यात पुढील प्रमाणे इक्वेशन ठेवून सामना जिंकावा लागणार आहे. तरच पाकिस्तान सेमी फायनल गाठू शकणार आहे.

तर पाकिस्तान सेमी फायनलसाठी होईल पात्र

  • पाकिस्तानने 300 धावा केल्या तर इंग्लंडला 13 धावात गुंडाळावं लागेल.

  • जर पाकिस्तानने 400 धावा केल्या तर इंग्लंडला 112 धावात गुंडाळावं लागेल.

  • जर पाकिस्तानने 450 धावा केल्या तर इंग्लंडला 162 धावात गुंडाळावं लागेल.

  • जर पाकिस्तानने 500 धावांची विक्रम केला तर इंग्लंडला 211 धावात गुंडाळावं लागेल.

पाकिस्तान हे दिव्य पार करेल असं वाटत नाही. त्यामुळे पाकिस्तानचं कोलाकात्यातून थेट कराचीचं तिकीट जवळपास नक्की झालं आहे. त्यांचे सामान आधीच विमानतळावर पोहचलं आहे. वानखेडेत भारत आणि पाकिस्तान नाही तर भारत - न्यूझीलंड सामना होण्याची दाट शक्यता आहे.

भारताला 2019 च्या वनडे वर्ल्डकपमधील सेमी फायनलचा बदला घेण्याची संधी मिळेल. 2019 च्या सेमी फायनलमध्ये देखील भारत - न्यूझीलंड आमने सामने आले होते. त्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला होता.

न्यूजीलंडने भारतासमोर विजयासाठी 240 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताचा संपूर्ण डाव 49.3 षटकात 221 धावांवर संपुष्टात आला. महेंद्रसिंह धोनी 72 चेंडूत 50 धावा करून बाद झाला. त्यावेळी भारताला विजयासाठी 9 चेंडूत 24 धावांची गरज होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT