Pakistan vs Australia Rawalpindi Batting Pitch  esakal
क्रीडा

रावळपिंडी खेळपट्टीवरून पाकची फजिती; ICC च्या रेटिंगकडे लक्ष

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलिया तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तान दौरा करत आहे. या दौऱ्यावर काही दर्जेदार कामगिरी पहावयास मिळेल असे वाटत होते. मात्र रावळपिंडी (Rawalpindi Pitch) येथे खेळल्या गेलेल्या पहिल्याच कसोटीत खेळपट्टीने (Test Pitch) सगळ्यांची निराशा केली. या खेळपट्टीवर क्रिकेट जाणकार आणि चाहत्यांनी सडकून टीका केली आहे. काहींनी तर ही खेळपट्टीची तुलना हायवेशी केली. या खेळपट्टीवर 5 दिवसात फक्त 14 विकेट पडल्या तर तब्बल 1187 धावांचा डोंगर उभा राहिला.

पाकिस्तान - ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील पहिल्या रावळपिंडी कसोटीची खेळपट्टी ही फलंदाजांना अत्यंत पोषक (Batting Pitch) अशी बनवण्यात आली होती. या खेळपट्टीबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) म्हणाला, या खेळपट्टीबाबत निर्णय घेण्याचे काम मी चाहते आणि समालोचकांवर सोपवतो. प्रत्येक जण बॅट आणि बॉल मध्ये एक स्पर्धा पाहण्यासाठी येत असतो. कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) अशी स्पर्धा सर्वात सुंदर आहे. ज्यावेळी सामना कोणत्याही निकालाशिवाय संपला त्यावेळी पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद 252 धावा केल्या होत्या. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 4 बाद 476 धावा करून डाव घोषित केला होता.

सामन्यात फलंदाजांचा दबदबा होता. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक आणि अब्दुल्ला शफीक या दोघांनीही दोन्ही डावात. शतके ठोकली. ही जोडी ऑस्ट्रेलियाविरूद्ध दोन्ही डावात शतक ठोकणारी पहिली जोडी ठरली. दरम्यान, आता या रावळपिंडीच्या खेळपट्टीबाबत आयसीसी कोणता निर्णय घेणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ही खेळपट्टी खराब होती हे मान्य करायला तयार नाही. ऑस्ट्रेलिया 1998 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेली आहे. या दौऱ्यातील दुसरा सामना शनिवारपासून कराची येथे सुरू होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, राज्यपाल रात्री अचानक गेले राज्याबाहेर; काँग्रेससमोर पेच?

Rajat Patidar: आरसीबी फायनलमध्ये! पाटीदारच्या 'त्या' एका निर्णयामुळे गुजरात टायटन्स भुईसपाट; नेमकं काय घडलं?

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT