Mohammad Rizwan Surpasses Virat Kohli  esakal
क्रीडा

Mohammad Rizwan : बाबर पाठोपाठ रिझवाननेही विराटला टाकलं मागे

अनिरुद्ध संकपाळ

Mohammad Rizwan Pakistan Vs England 1st T20 : मोहालीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 सामना सुरू असतानाच तिकडे सीमेपार कराचीत पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात देखील टी 20 सामना रंगला आहे. तिकडेही इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी 85 धावांची सलामी दिली. दरम्यान, पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानने एक माईल स्टोन पार केला. हा माईल स्टोन पार करताना त्याने भारतीची रन मशिन विराट कोहलीला मागे टाकले. यापूर्वी बाबर आझमने देखील विराट कोहीलाला मागे टाकले होते.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने दमदार सुरूवात केली. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान 9.5 षटकात 85 धावांची सलामी दिली. दरम्यान, मोहम्मद रिझवानने आपल्या टी 20 मधील 2000 धावा पूर्ण केल्या. रिझवानने फक्त टी 20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार करण्याचा माईल स्टोन गाठला नाही तर त्याने विक्रमही केला. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 2000 धावा करणाऱ्यांच्या यादीत आता तो बाबर आझमसोबत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्याने 52 डावात ही कामगिरी केली. बाबर आझमने देखील 52 डावत 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.

याच यादीत भारताचा विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 56 टी 20 डावात 2000 धावांचा टप्पा पार केला होता. या यादीत तिसऱ्या स्थानावर भारताचाच केएल राहुल आहे. त्याने 58 डावात टी 20 मध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचने 2000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी 62 डाव घेतले होते.

पाकिस्तानने इंग्लंडविरूद्ध धडाकेबाज सुरूवात केली तरी बाबर आझम (31) आणि मोहम्मद रिझवान (68) बाद झाल्यानतंर पाकिस्तानचा डाव ढेपाळला. त्यांना 20 षटकात 7 बाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून लुक वूडने 3 तर आदिल राशिदने 2 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदललं, गोपीचंद पडळकरांच्या मतदार संघातील साखर कारखाना कमानीवर वेगळचं नाव...

Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशमध्ये धावत्या बसने अचानक कसा घेतला पेट? पहाटे ३ च्या सुमारास नेमकं काय घडलं? वाचा...

Latest Marathi News Live Update : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाशांवर कारवाई, भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम

राजकीय हाराकिरी

भाऊबीजेच्या दिवशी दुर्दैवी घटना! मुलाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आईला हृदयविकाराचा झटका; बहिणीनं भावाचं औक्षण करत दिला निरोप

SCROLL FOR NEXT