Pakistan Vs New Zealand 2nd ODI Naseem Shah esakal
क्रीडा

PAK vs NZ : पाकिस्तानच्या दिग्गजांना जमलं नाही ते नसीम शाहनं करून दाखवलं; प्रस्थापित केलं वर्ल्ड रेकॉर्ड!

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Vs New Zealand 2nd ODI Naseem Shah : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना न्यूझीलंडने 79 धावांनी जिंकत मालिकेत 1 - 1 अशी बरोबरी साधली. जरी सामना पाकिस्तानने गमावला असला तरी पाकिस्तानचा 19 वर्षांचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने एक विश्वविक्रम प्रस्थापित केला.

नसीम शाहने कारकिर्दिच्या पहिल्या 5 वनडे सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 5 वनडे सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. नसीम शाहने ऑस्ट्रेलियाच्या रियान हॅरिसचे रेकॉर्ड मोडले. त्याने आपल्या पहिल्या 5 वनडे सामन्यात 17 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर या यादीत वेस्ट इंडीजचा माजी गोलंदाज गॅरी गिल्मर यांचा तिसरा नंबर लागतो. त्यांनी 5 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या होत्या.

तिसऱ्या क्रमांकासाठी मुस्तफिजूर आणि गॅरी गिल्मर यांच्यात टाय झाला आहे. बांगलादेशच्या मुस्तफिजूरने देखील 5 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानच्या नसीम शाहने 19 व्या वर्षीच वर्ल्ड रेकॉर्ड बनले. येणाऱ्या काळात हे वर्ल्ड रेकॉर्ड कोण मोडते हे पहावे लागेल.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 261 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून कॉन्वेने दमदार 101 धावांची शतकी खेळी केली. तर केन विलियम्सनने 85 धावा करून बाद झाला. त्यानंतर पाकिस्तानचा संघ ही धावसंख्या चेस करण्यासाठी मैदानात उतरला त्यावेळी त्यांचा संपूर्ण संघ 182 धावात पॅव्हेलिनमध्ये परतला. पाकिस्तानकडून फक्त कर्णधार बाबर आझमने 79 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदी, इश सोधीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon :खडसेंच्या घरात चोरी! ५ तोळं सोनं आणि ३५ हजार लंपास; एकनाथ खडसे म्हणाले, जळगावात पोलिसांचा धाक राहिला नाही

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

UP Encounter: योगींच्या पोलिसांनी एका शहरात केले डबल एनकाऊंटर! तिघांच्या पायाला गोळी; गुन्हेगारीचा मोठा इतिहास!

Arjun Tendulkar: 4,4,4,4,4,4,6! अर्जुनच्या फटकेबाजीमुळे गोवा संघाचा कमबॅक; आधी ३ विकेट्स घेऊन कर्नाटकला दिलेले धक्के...

Sugarcane Dispute : आमदार यड्रावकरांच्या कारखान्याची ऊस वाहतूक रोखली, पोलिसांची अरेरावी; पोलिस निरिक्षकानेच आंदोलकांना दिल्या शिव्या...

SCROLL FOR NEXT