Pakistan Vs Sri Lanka Asia Cup 2023  esakal
क्रीडा

PAK vs SL : नाणेफेक झाली.. सामना सुरू झाला.. नियम मात्र बदलले; पाकिस्तानला होणार का फायदा?

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Vs Sri Lanka Asia Cup 2023 : आशिया कपचा दुसरा फायनलिस्ट ठरवण्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला सामना, भारत - पाकिस्तान सामना अखेर सुरू झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकीत उशीर झाला. मात्र अखेर दीड तासानंतर नाणेफेक झाली आणि सामना सुरू झाला. परंतु सामन्याच्या षटकांमध्ये घट करण्यात आली आहे. तसेच पॉवर प्लेच्या नियमात देखील बदल करण्यात आला आहे.

सामन्याची नाणेफेक 5 वाजता झाली. तर सामन्याला 5.15 वाजता सुरूवात झाली. मात्र हा सामना प्रत्येकी 45 षटकांचा केला आहे. पॉवर प्ले हे 9, 27 आणि 9 षटकांचे असणार आहेत. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांना सुरूवातीलाच पहिला धक्का बसला. प्रमोद मधुशानने फखर जमानचा 4 धावांवर त्रिफळा उडवला.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तान आणि श्रीलंकेसाठी हा सामना करो या मरो स्थितील सामना आहे. या सामन्यातील विजेता हा 17 सप्टेंबरला भारताविरूद्ध आशिया कपच्या ट्रॉफीसाठी खेळणार आहे.

पावसामुळे आधीच सामन्याची 5 षटके कमी झाली आहेत. मात्र तर पावसामुळे सामना रद्द झाला तर नेट रनरेटच्या आधावर विजेता ठरवला जाणार आहे. श्रीलंकेचे नेट रनरेट हे पाकिस्तानपेक्षा सरस आहे. ते सध्या - 0.200 आहे तर पाकिस्तानचे नेट रनरेट - 1.892 इतके आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

Varya AI : भारताचं पहिलं AI व्हिडिओ टूल लाँच! फक्त टेक्स्ट टाकताच बनेल व्हिडिओ; पोस्ट करून कमवा हजारो रुपये, कसं वापरायचं? पाहा

Latest Live Updates Marathi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

Pune: केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे ७५ अमरनाथ यात्रेकरूंचा मार्ग मोकळा; विमान रद्द झाल्यानंतर तातडीने उपलब्ध करून दिली पर्यायी व्यवस्था

SCROLL FOR NEXT