क्रीडा

World Cup 2019 : पाकिस्तान संघ म्हणतोय आता इमाद वसीमला कर्णधार करा

वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : लंडन :  विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर पाकिस्तान संघात मतभेद असल्याचे समोर येत होते. भारताविरुद्धच्या पराभवानंतर त्याचा भडका उडाला. नियोजित कर्णधार सर्फराज अहमदला हटवून इमाद वसीमला कर्णधार करण्याची मागणी जोर धरत असल्याचे समजते. 

पाकिस्तानच्या ड्रेसिंगरूमधील वातावरण भारताविरुद्धच्या पराभवानंतर आणखीनच बिघडले आहे. कर्णधार सर्फराज अहमदने सहकाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्याचा इशारा दिल्याचे वृत्त समोर येत असतानाच कर्णधाराने सहकारी खेळाडूंवर आगपाखड केल्याचेही बोलले जात आहे. सर्फराजने वहाब रियाझ, इमाम उल हक, बाबर आझम, इमाद वसीम यांना अपयशास जबाबदार धरले आहे. त्याचवेळी शोएब मलिक खेळाडूंना आपल्याविरुद्ध भडकावत असल्याचाही आरोप त्याने केला आहे. गटबाजीच्या कारस्थानात पाकिस्तान संघ अडकल्याचे त्याचे म्हणणे आहे. 

भारताविरुद्धच्या पराभवानंतर ड्रेसिंगरुमध्ये झालेल्या बैठकीत सर्फराज फाडफाड बोलत असताना प्रशिक्षक मिकी आर्थर आणि व्यवस्थापक तलत अली अगदी तोंडावर बोट ठेवून बसले होते. इमाम वसिला कर्णधारपद हवे असल्याने तो आपल्याविरुद्ध कट रचतोय असाही एक आरोप सर्फराजने केला आहे. पाकिस्तान संघातील खेळाडूंमध्ये समन्वय नाही आणि व्यवस्थापक तलत अली यात अपयशी ठरले आहे. त्यांचे खेळाडूंवर नियंत्रण नसल्याचेही बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामान खात्याची मोठी माहिती

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT