Asif Ali  SAKAL
क्रीडा

ICC Award : रातोरात हिरो झालेल्या पाक फलंदाजानं मारली बाजी!

असिफ अलीने ICC T20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेत पाकिस्तानी संघाला सेमीफायनलमध्ये पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सुशांत जाधव

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानच्या असिफ अलीला आक्टोबर महिन्यातील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि नामिबियाचा डेविड विसे या दोघांची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. यात पाकिस्तानी खेळाडूनं बाजी मारलीये.

असिफ अलीने ICC T20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेत पाकिस्तानी संघाला सेमीफायनलमध्ये पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या असिफ अलीने न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात मॅच विनिंग खेळी केली होती. दोन्ही सामने रंगतदार झाले होते. पाकिस्तानकडून अलीची खेळी सामन्याला कलाटणी देणारी ठरली होती.

असिफ अलीला वर्ल्ड कप संघात अखेरच्या क्षणी स्थान मिळाले. आपल्या कामगिरीनं त्याने निवड समितीची विश्वास सार्थ ठरवला आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा स्ट्राइक रेट 270 पेक्षा अधिक आहे. अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात करीम जनतच्या एका षटकात त्याने चार षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिला होता.

महिला गटातून आयर्लंडची कर्णधार लॉरा डेलानी हिला महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. झिम्बाब्वे विरुद्ध वनडे मालिका विजयात तिने मोलाची भूमिका बजावली होती. 189 धावासह तिने 4 विकेट घेतल्या होत्या.

दोन सामन्यात छोटेखानी खेळी करुन असिफ अली रातोरात हिरो झालाय. वर्ल्ड कप स्पर्धेतील धमाकेदारी खेळीनं आता क्रिकेट जगतात त्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. सुपर 12 मधील सर्वच्या सर्व लढती जिंकून त्यांनी दिमाखात सेमीफायनल गाठलीये. असिफ अली मॅच फिनिशिंगच्या रुपात आपली छाप उमटवताना दिसतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT