Javed-Miandad 
क्रीडा

हिंदू असल्याने कनेरियावर अन्याय केला असता तर...; मियाँदादची जहरी टीका

वृत्तसंस्था

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज 'रावळपिंडी एक्सप्रेस' शोएब अख्तरने फिरकीपटू दानिश कनेरियाबद्दल मोठा खुलासा केल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील क्रिकेटविश्व सध्या ढवळून निघाले आहे.

या प्रकरणी माध्यमांशी बोलताना शोएब खरं बोलत असल्याची प्रतिक्रिया दानिश कनेरियाने दिल्यानंतर उलट हे प्रकरण पुन्हा जोर धरू लागले आहे. 

या प्रकरणात आता आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी उडी घेतली आहे. दानिश हा पैशांसाठी काहीही बोलू शकतो, अशी जहरी टीका मियाँदाद यांनी केली आहे. 

'पीटीआय'शी बोलताना ते पुढे म्हणाले, ''कनेरिया जे बोलत आहे ते पूर्णपणे खोटे आहे. हिंदू असल्याने त्याच्यावर जर अन्याय झाला असता, तर तो दहा वर्षे संघातर्फे कसा काय खेळू शकला असता? खोटे बोलून कनेरिया पाकिस्तानच्या मिठाला जागला नाही. फिक्सिंगप्रकरणी त्याच्यावर बंदी घालण्यात आली. तेव्हाच त्याचं क्रिकेटमधील महत्त्व संपलं. आणि महत्त्वाची गोष्ट ही की, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या खेळाडूवर लोक विश्वास ठेवत आहेत.''

दरम्यान शोएब अख्तरबद्दल बोलताना मियाँदाद म्हणाले, शोएब अख्तर आणि कनेरिया हे दोन्ही खेळाडू निवृत्त झाल्यामुळे सध्या संघात नाहीत. तसेच त्यांचा क्रिकेट बोर्डाशी काहीही संबंध नाही. 2000 च्या काळात मी पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहिलो आहे. तेव्हा मला कनेरियावर हिंदू असल्यामुळे त्याला इतर खेळाडू त्रास देत आहेत, असं कधी जाणवलं नाही.

तसेच बोर्डाने कधी धर्मावरून एखाद्या खेळाडूवर अन्याय केला नाही. त्यामुळे या दोघांना किती महत्त्व द्यायचे आणि चर्चा करायची हे ठरवावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Restriction: मोदी सरकारचा मोठा निर्णय! AI व्हिडीओ हटवले जाणार; अनेक विभागांना मिळणार कंटेंट काढण्याचे अधिकार

Education News : पालकांना मोठा दिलासा! आरटीई प्रवेशासाठी १ किमीची अट रद्द; आता ५ किमीपर्यंतच्या शाळा निवडता येणार

नागपूरमधील कोराडी औष्णिक विद्युत केंद्र उडवून देण्याची धमकी; अज्ञात ई-मेलनंतर खळबळ, परिसरात हायअलर्ट

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Nashik Chain Snatching : नाशिकमध्ये चोरट्यांचा हैदोस! २४ तासांत पाच महिलांना लुटले; ६ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT