क्रीडा

क्रिकेटची मान झुकली! पाकिस्तानी खेळाडूला १२ वर्षांची शिक्षा.. खासदाराच्या हत्येला प्रोत्साहन देण्याचा आरोप

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने नेदरलँडच्या खासदाराचा शिरच्छेद करण्यासाठी २१ हजार युरोचे बक्षिस जाहीर केलं होतं.

Manoj Bhalerao

क्रिकेटला जंटलमॅन गेम म्हटल जात. पण क्रिकेट विश्व हादरुन सोडणारी घटना समोर आली आहे.नीदरलँडच्या एका न्यायालयाने माजी पाकिस्तानी क्रिकेटर खालिद लतीफ याला १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. नीदरलँडचे नेते ग्रीट विल्डर यांच्या हत्येसाठी लोकांना उकसवण्याच्या आरोपाखाली त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. लतीफने एका कथित व्हिडीओमध्ये डच खासदार ग्रीट वाइल्डर्स यांचा शिरच्छेद करणाऱ्याला २१,००० युरोच्या बक्षिसाची घोषणा केली होती.

विल्डर्सच्या या कृत्यावर नाराज झाला होता खालिद

सरकारी वकिलांनीही कोर्टात आपल्या युक्तिवादात हे मुद्दे मांडले होते. वाइल्डर्सने 2018 मध्ये प्रेषित मोहम्मद दर्शविणारी व्यंगचित्र स्पर्धा आयोजित करण्याची योजना आखली होती, परंतु लोकांनी निषेध दर्शवल्यानंतर आणि त्यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर ती रद्द केली गेली. ग्रेट वाइल्डर्सच्या या घोषणेनंतरच खालिदने हा कथित व्हिडिओ शेअर केला होता. डच खासदार गीर्ट वाइल्डर्स हे त्यांच्या इस्लामविरोधी वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

सध्या ३७ वर्षीय खालिद लतीफ पाकिस्तानात वास्तव्यास आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान तो कधीही न्यायालयात हजर झाला नाही. नेदरलँड्समध्ये त्याला कधीच ताब्यात घेण्यात आले नाही. न्यायालयाने लतीफला त्याच्या अनुपस्थितीत ही शिक्षा सुनावली. लतीफला ही शिक्षा होण्याची शक्यता फारच कमी आहे.

न्यायाधीश वर्बीक म्हणाले की, त्याच्या घोषणेने क्वचितच लोकांनी त्याच्या जीवे मारण्याच्या धमकीवर लक्ष दिले असेल, त्याला याची जाण होती. त्याच्या वक्तव्याने आगीत तेल घालण्याचं काम केलं. (Latest Marathi news)

लतीफ याआधीही वादात सापडला आहे

खालिद अहमदने पाकिस्तानकडून 5 वनडे आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत. उजव्या हाताचा फलंदाज खालिद लतीफने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 29.40 च्या सरासरीने 147 धावा केल्या, ज्यात एक अर्धशतक आहे. तर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्या नावावर 21.54 च्या सरासरीने 237 धावा आहेत. खालिद लतीफनेही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावले.

लतीफने पाकिस्तान संघासाठी शेवटचा क्रिकेट सामना २०१६मध्ये खेळला होता. खालिद लतीफ याआधीही वादात सापडला आहे. 2017 मध्ये, स्पॉट-फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर लतीफवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. याशिवाय त्याच्यावर एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT