Sakal Exclusive Danish Kaneria sakal
क्रीडा

Sakal Exclusive : पाकिस्तानच्या 'या' खेळाडूला भारतात राम मंदिर पाहायचाय

दोन्ही देशातील खेळाडू मध्ये नेहमीच मैत्रीपूर्ण नातं पाहायला मिळतं. अनेक पाकिस्तानी खेळाडू भारत देशाबद्दल असलेलं आकर्षण नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Sakal Exclusive Danish Kaneria : भारत-पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी संघ आहे. या दोघांमध्ये क्रिकेट सामने नेहमीच रोमांचक असतात. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील वादांमुळे हे दोन संघ द्विपक्षीय मालिका खेळत नाही. हे दोन्ही संघ फक्त ICC इव्हेंटमध्ये आमने-सामने येतात. या दोन्ही देशातील खेळाडू मध्ये नेहमीच मैत्रीपूर्ण नातं पाहायला मिळतं. अनेक पाकिस्तानी खेळाडू भारत देशाबद्दल असलेलं आकर्षण नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. असाच एक खेळाडू म्हणजे पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज दानिश कनेरिया. दानिशने सकाळला दिलेल्या विशेष मुलाखतीत भारताबद्दलच प्रेम व्यक्त केले.

सकाळ समूहाने घेतलेल्या विशेष मुलाखतीत दानिश कनेरियाला भारतात येण्याची संधी मिळाली तर आता कोणत्या ठिकाणी जायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला की, मी या आधी पण भारतात आलो आहे. आता राम मंदिर बनले आहे, तर इच्छा आहे भारतात आल्यावर पहिल्यांदा आयोध्याला जाईल. त्याच्या व्यतिरिक्त यात्रेची ठिकाण आहे, मंदिर आहे. निश्चितपणे भारतात आल्यावर मी पहिल्यांदा येथे जाईल.

पाकिस्तान हे एक मुस्लीम राष्ट्र आहे, पण तेथे हिंदू धर्मीयही राहतात. जे अल्पसंख्याक आहेत. पाकिस्तानच्या क्रिकेट संघातून ही हिंदू खेळाडू खेळलेले आहेत. दानिश कनेरिया हा हिंदू आहे जो पाकिस्तानकडून खेळला आणि चांगलाच प्रसिद्धही झाला.

पाकिस्तानचा महान लेगस्पिनर दानिश कनेरियाने पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामन्यात 261 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 15 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघात खेळणारा कनेरिया हा दुसरा हिंदू खेळाडू होता. दानिश कनेरियाने पाकिस्तानकडून 2000 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो 10 वर्षे पाकिस्तानी ड्रेसिंग रूमचा भाग होता. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 15 वेळा पाच बळी आणि दोनदा एका सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT