Pankaj Advani Sakal
क्रीडा

Pankaj Advani : पंकज अडवाणीने पुन्हा केली कमाल; जागतिक बिलियड्‌र्स अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर उमटवली मोहोर

पंकज अडवाणी याने मंगळवारी भारताच्याच सौरव कोठारीला पराभूत करून जागतिक बिलियड्‌र्स अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली.

सकाळ वृत्तसेवा

Pankaj Advani : भारताचा दिग्गज खेळाडू पंकज अडवाणी याने मंगळवारी भारताच्याच सौरव कोठारीला पराभूत करून जागतिक बिलियड्‌र्स अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. हे त्याचे २६वे अजिंक्यपद ठरले, हे विशेष.

पंकज याने २००५मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. पंकज याने प्रदीर्घ प्रकारात नऊ वेळा विश्‍वविजेता होण्याचा मान संपादन केला आहे. तसेच गुणांच्या प्रकारात तो आठ वेळा विश्‍वविजेता ठरला आहे. जागतिक सांघिक बिलियड्‌र्स अजिंक्यपद स्पर्धाही त्याने एक वेळा जिंकली आहे.

पंकज याने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत रुपेश शाह याच्यावर ९००-२७३ असा विजय मिळवत आगेकूच केली होती. सौरव याने उपांत्य फेरीच्या लढतीत ध्रुव सितवाला याला ९००-७५६ अशा फरकाने पराभूत केले होते. अंतिम फेरीच्या लढतीत पंकज याने सौरव याला १०००-४१६ असे नमवत झळाळता करंडक पटकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT