Pardeep Narwal and Maninder Singh Sakal
क्रीडा

Pro Kabaddi 11 लिलावापूर्वी विशेष ध्वजारोहण समारंभात परदिप अन् मनिंदरचा सहभाग

Independence Day Celebrations: परदिप नरवाल आणि मनिंदर सिंग हे स्टार कबड्डीपटू स्वातंत्र्य दिनानिमित्त एका शाळेच्या ध्वजारोहण समारंभात सहभागी झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

Pardeep Narwal and Maninder Singh : आज संपूर्ण भारत देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना परदिप नरवाल आणि मनिंदर सिंग या प्रो कबड्डी लीग मधील स्टार खेळाडूंनी डिस्ने स्टार आणि युवा अन स्टॉपेबल यांनी पाठिंबा दिलेल्या मुंबई पब्लिक स्कूल या शासकीय शाळेच्या खास ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला.

देशातील सर्वाधिक लोकप्रिय कबड्डीपटूंपैकी एक असलेल्या परदिप व मनिंदर यांनी ध्वजारोहणानंतर शाळेच्या कबड्डी संघाबरोबर मनोरंजनात्मक कबड्डी सत्रात सहभाग घेतला. तसेच त्यांनी शाळेला व शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक भेटवस्तूही दिल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

याप्रसंगी परदीप नरवाल म्हणाला की, कबड्डी हा भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा घटक असून तो स्वातंत्र्यपूर्वीही प्राचीन काळापासून खेळला जातो. इतक्या मुलांना मोठ्या संख्येने आजही कबड्डीत रस घेताना पाहून मला आनंद झाला आहे. त्यांच्या बरोबर ध्वजारोहण समारंभात भाग घेतला मला अतिशय आनंद झाला आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मनिंदर सिंग याप्रसंगी म्हणाला की, देशाच्या कानाकोपऱ्यात कबड्डी हा खेळ खेळला जातो आणि ही परंपरा शेकडो वर्षे अशीच कायम राहील अशी माझी खात्री आहे. कबड्डी हा भारतातील नागरिकांच्या जणू रक्तातच असून त्यांचे आम्हाला मिळणारे प्रेम व पाठिंबा यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. कबड्डी या खेळाचा सर्वांगीण विकास घडवून आणल्याबद्दल प्रो कबड्डी लीग संयोजकांनाही धन्यवाद. सर्व देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव 15 व 16 ऑगस्ट रोजी मुंबईत होत असून त्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी 7 वाजल्यापासून स्टार स्पोर्टस वाहिन्या आणि डिस्ने हॉट स्टार वर पाहता येणार आहे.

तसेच प्रो कबड्डी लीगचे ऑफिशियाल ऍप prokabaddi.com किंवा इंस्टा, युट्यूब फेसबुक आणि एक्स या संकेतस्थळावर @prokabaddi या अकाऊंट वरही पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT