Paris 2024 Olympics badminton draw PV Sindhu sakal
क्रीडा

Paris Olympics Badminton Schedule : सिंधू, प्रणोयसाठी सोपा ड्रॉ! बॅडमिंटन खेळाचे वेळापत्रक जाहीर

Paris 2024 Olympics badminton draw : सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदक जिंकून भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर रुबाबात फडकवणारी पी. व्ही. सिंधू हिच्याकडे पदकांची हॅट्‌ट्रिक करण्याची संधी असणार आहे.

Kiran Mahanavar

Olympic Badminton Schedule : सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदक जिंकून भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर रुबाबात फडकवणारी पी. व्ही. सिंधू हिच्याकडे पदकांची हॅट्‌ट्रिक करण्याची संधी असणार आहे. यंदाच्या पॅरिस ऑलिंपिकसाठी बॅडमिंटन या खेळाचा ड्रॉ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यानुसार शटलक्वीन पी. व्ही. सिंधू व एच. एस. प्रणोय या भारतीय खेळाडूंसाठी सोपा ड्रॉ मिळाला आहे. लक्ष्य सेन याच्यासमोर मात्र खडतर आव्हान असणार आहे.

१०व्या मानांकित पी. व्ही. सिंधू हिला महिला एकेरी विभागात जागतिक क्रमवारीत ७५व्या स्थानावर असलेल्या ख्रिस्तीन कुबा व १११व्या स्थानावर असलेल्या फातिमा नाबाहा अब्दुल रझ्झाक यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. कुबा ही इस्तोनियाची असून फातिमा मालदीवची आहे. सिंधूचा म गटात समावेश आहे. एच. एस. प्रणोय पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये खेळत आहे. प्रणोयचा क गटात समावेश आहे. या गटामध्ये त्याला जागतिक क्रमवारीत ७०व्या स्थानावर असलेल्या व्हीएतनामच्या ली फाट याचा सामना करावयाचा आहे, तसेच जर्मनीच्या फॅबियन रोट याचे आव्हानही त्याला पार पाडावे लागणार आहे. फॅबियन हा जागतिक क्रमवारीत ८२व्या स्थानावर आहे.

बाद फेरीत चीनच्या खेळाडूंचा अडथळा

पी. व्ही. सिंधू हिने साखळी फेरीचा अडथळा ओलांडल्यास तिच्यासमोर चीनच्या खेळाडूंचा अडथळा असणार आहे. अंतिम १६च्या फेरीत सिंधूसमोर चीनच्या ही बिंग जिओ हिचे आव्हान असेल. या लढतीत विजयी ठरल्यास सिंधूला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चेन फेई या चीनच्या खेळाडूला लढत द्यावी लागणार आहे. ॲन सी यंग, कॅरोलिना मरीन व तेई यिंग या दिग्गज खेळाडूंचा सामना सिंधूला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत करावा लागणार नाही. या खेळाडूंशी तिला थेट उपांत्य फेरीतच लढावे लागेल.

लक्ष्यचा जॉनाथन ख्रिस्तीशी सामना

भारताच्या लक्ष्य सेन याला मात्र तिसऱ्या मानांकित इंडोनेशियाच्या जॉनाथन ख्रिस्तीचा सामना करावयाचा आहे, तसेच ग्वाटमाला देशाचा केव्हीन गॉर्डन व बेल्जियमचा ज्युलियन करागी यांनाही लक्ष्य याला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. लक्ष्यचा ल गटात समावेश आहे.

तनीशा-अश्‍विनी क गटात

तनीशा क्रॅस्टो-अश्‍विनी पोन्नाप्पा ही जोडी महिला दुहेरीत सहभागी होणार आहे. क गटात या जोडीचा समावेश आहे. या जोडीला चौथी मानांकित जोडी नामी मातसुयामा-चिहारू शिदा या जोडीचा सामना करावा लागणार आहे, तसेच किम यिआँग-काँग याँग, सेतयाना मेपासा-अँजेला यू या जोड्यांचाही क गटात समावेश आहे. चिराग शेट्टी-सात्विक साईराज रंकीरेड्डी ही जोडी पुरुष दुहेरीत सहभागी होते, मात्र पुरुष दुहेरीचा ड्रॉ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT