Neeraj Chopra Point Table esakal
क्रीडा

Olympic 2024 Medal Table: अर्शद नदीमचा भारताला दुहेरी धक्का! 'गोल्ड' घेतलं अन् पदकतालिकेतही हरवलं; वाचा आपण कितव्या क्रमांकावर

Paris Olympic 2024: भारतीयांना पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गुरुवारी मध्यरात्री नीरज चोप्राने भालाफेकीतील हक्काचं गोल्ड गमावलं.. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पक्कं केलं.

Swadesh Ghanekar

India at Paris Olympic 2024 Medal Table : पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ( Arshad Nadeem) ९२.९७ मीटर लांब भाला फेकला अन् भारताच्या नीरज चोप्राचे ( Neeraj Chopra) हक्काचे सुवर्णपदक हुकले. नीरजला ८९.४५ मीटरसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर ग्रेनाडाचा अँडरसन पीटर ८८.५४ मीटरसह तिसरा आला. अर्शदने पाकिस्तानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने ऑलिम्पिक विक्रमाची नोंद करताना भीमपराक्रम केला आणि त्याच्या या पराक्रमाचा भारताला पदकतालिकेतही धक्का बसला...

भालाफेकीच्या फायनलमध्ये काय घडलं?

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पहिल्या प्रयत्नात फाऊल केला, परंतु दुसऱ्याच प्रयत्नात त्याने भाला थेट ९२.९७ मीटर लांब फेकला. त्याने या ऑलिम्पिक विक्रमासह नीरज आणि अन्य प्रतिस्पर्धींवर मानसिक दडपण टाकले. अर्शदने नवा ऑलिम्पिक आणि आशियाई विक्रम स्वतःच्या नावावर केला. त्यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मीटर लांब भाला फेकला आणि सीझनमधील सर्वोत्तम कामगिरीसह सामन्यात पुनरागमनाची आशा दाखवली. पण, नीरजचा सहापैकी एकच प्रयत्न यशस्वी राहिला. त्यामुळे त्याला रौप्यवर समाधान मानावे लागले. पीटरने ८८.५४ मीटरसह कांस्यपद नावावर केले.

गुणतालिकेत कोण अव्वल?

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेचे वर्चस्व पाहायला मिळत आहे आणि यंदा पदकाचे शतक साजरे करणारा तो पहिला देश ठरला आहे. अमेरिकेने ३० सुवर्ण, ३८ रौप्य व ३५ कांस्य अशी एकूण १०३ पदकं जिंकली आहेत. चीन २९ सुवर्ण, २५ रौप्य व १९ कांस्यसह एकूण ७३ पदकं जिंकली आहेत आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलिया ( ४५ पदकं), फ्रान्स ( ५४) व ग्रेट ब्रिटन ( ५१ ) हे अव्वल पाचमध्ये आहेत.

भारताचे ५, तर पाकिस्तानचे १ पदक पण...

अर्शद नदीमने पाकिस्तानला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी करून पाकिस्तानचे पदकाचे खाते उघडले. ऑलिम्पिक २०२४ मध्ये पाकिस्तानचे सात खेळाडूच सहभागी झाले होते आणि त्यात पदक जिंकणारा अर्शद हा एकमेव खेळाडू ठरला. पण, त्याच्या या पदकाने पाकिस्तानला पदक तालिकेत ५३व्या क्रमांकावर पोहोचवले.

नीरज चोप्राच्या रौप्यपदकामुळे भारताच्या पदकांची संख्या पाच झाली आहे. तत्पूर्वी पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते. त्यांनी स्पेनचा पराभव करून सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत ५२ वर्षांनंतर दोन पदकं जिंकण्याचा पराक्रम केला. नेमबाज मनु भाकरने दोन कांस्यपदक जिंकली आहेत, तर स्वप्नील कुसाळेनेही नेमबाजीचे कांस्य जिंकले आहे. तरीही भारत ६४ व्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT