Paris Oly SatwikChirag esakal
क्रीडा

India at Paris Olympic 2024 : ही काय फालतुगिरी! हरायचंच होतं मग भारतीय जोडीला बाहेर का केले?

Paris Olympic 2024 Sat-chi : भारतासाठी स्पर्धेचा सहावा दिवस काही खास राहिला नव्हता... बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या पदकाच्या प्रबळ दावेदार असलेल्या जोडीला कडवी टक्कर देऊनही हार मानावी लागली...

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Badminton update: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील गुरुवारचा दिवस भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा करणारा ठरला. स्टार खेळाडू पी व्ही सिंधू हिचा पराभव हा सर्वांसाठी मोठा धक्का होता. तत्पूर्वी यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक निश्चित जिंकतील अशी सात्विक साईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी ही जोडी पण हरली. लक्ष्य सेनने आगेकूच केली, परंतु त्याने भारताच्याच एच एस प्रणॉयचा पराभव केला.

भारताच्या पुरुष दुहेरी गटात खेळणारी जोडी सात्विक व चिराग यांना काल उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. सात्विक व चिराग जोडीने पहिला गेम १७ मिनिटांत २१-१३ असा जिंकला होता, परंतु मलेशियन जोडी चिआ आरोन व सोह वूई यिक यांनी चांगले पुनरागमन केले. त्यांनी दुसऱ्या गेममध्ये चुरशीची टक्कर देताना २१-१४ अशी बाजी मारली आणि मॅच १-१ अशी बरोबरीत आली. तिसऱ्या गेममध्ये दोन्ही देशांच्या खेळाडूंकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली. पण, मलेशियन जोडीने २१-१६ असा गेम जिंकून भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आणले.

हराचेच होते मग...

भारतीय जोडीला उपांत्य फेरीत जाण्यापासून रोखणाऱ्या मलेशियन जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. चिआ आरोन व सोह वूई यिक यांना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चीनच्या लिआंग वेई केंग व वाँग चँग यांच्याकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. चिनी जोडीने पहिला गेम २१-१९ असा जिंकला. पण, मलेशियन जोडीने २१-१५ अशा विजयासह पुनरागमन केले. अखेरच्या गेममध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली, परंतु चिनी जोडी २१-१७ अशी वरचढ ठरली. त्यामुळे मलेशियन जोडीला कांस्यपदकाच्या लढतीसाठी खेळावे लागणार आहे. मलेशियन जोडीच्या पराभवामुळे हरायचंच होतं मग भारतीय जोडीला का बाहेर केले, असा सवाल चाहते करताना दिसत आहेत.

बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लक्ष्य सेन व एच एस प्रणॉय हे भारतीय खेळाडू समोरासमोर होते. लक्ष्यने २१-१२ व २१-६ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT