Lakshya Sen Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : लक्ष्य सेनचा विजय हटविल्यानंतर नेटिझन्स संतापले

Badminton Mens Singles paris olympic news | बॅडमिंटन पुरुष एकेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूची दुखापतीमुळे माघार

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : भारताचा प्रतिभाशाली युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने पॅरिस ऑलिंपिकच्या बॅडमिंटनमधील पुरुष एकेरीत शानदार विजयी सलामी दिली, मात्र नंतर त्याचा प्रतिस्पर्धी केविन कॉर्डन याने एल्बो दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे विजयी निकाल हटविण्यात आला.

लक्ष्यचा विजय हटविण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे नेटिझन्सना वाटत असून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डन याने सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिंपिकमधून माघार घेतल्यानंतर सोमवारी (ता. २९) सामना हटविण्यात आला. यामुळे ऑलिंपिकमधील पहिला विजय साकारलेल्या लक्ष्य याला जबरदस्त धक्का बसला.

एल गटातील लढतीत लक्ष्य याने २१-८, २२-२० असा चमकदार विजय नोंदविला. सामन्यातील पहिल्या गेममध्ये लक्ष्य याने ग्वाटेमालाच्या खेळाडूवर पूर्ण वर्चस्व राखले, मात्र पुढील गेममध्ये केविन कॉर्डन याने लक्ष्य सेनसमोर खडतर आव्हान उभे केले, मात्र भारतीय खेळाडूने बाजी मारली.

पहिल्या फेरीतील विजयामुळे लक्ष्य याच्या खाती गुण जमा झाला. मात्र, बेल्जियमच्या ज्युलियन कॅरॅगी याच्याविरुद्धच्या लढतीपूर्वीच २२ वर्षीय लक्ष्य याला झटका बसला. दुखापतीमुळे केविन कॉर्डन याने पॅरिस ऑलिंपिकमधून माघार घेतल्यामुळे लक्ष्यने नोंदविलेला निकाल रद्दबातल ठरविल्यामुळे त्याला राऊंड ऑफ १६ फेरी गाठण्यासाठी साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकावेच लागतील.

चाहत्यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया एक्स हॅण्डलवर (पूर्वाश्रमीचे ट्विटर) व्यक्त केल्या. प्रतिस्पर्ध्याने दुखापतीमुळे माघार घेतल्याने पहिला विजय रद्द करणे युवा खेळाडूसाठी अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT