Carolina Marin | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: ...अन् माजी सुवर्णपदक विजेतीला रडत सोडावं लागलं मैदान, पाहा बॅडमिंटनच्या सेमीफायनलमध्ये काय झालं?

Carolina Marin Cried after withdraw from semi-final: स्पेनची बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरिन हिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलचा सामना अर्ध्यावरच सोडावा लागला.

Pranali Kodre

Paris Olympic 2024 Badminton News: पॅरिस ऑलिम्पिकमधील अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. अनेक दिग्गज खेळाडूही या स्पर्धेत उतरले आहेत. २०१६ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेती स्पेनची बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरिनही या स्पर्धेत खेळण्यासाठी उतरली असून ती चांगल्या फॉर्ममध्येही खेळत होती.

मात्र उपांत्य फेरीतील सामना तिला अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सोडावा लागला. ती या सामन्यात दुर्दैवीरित्या दुखापतग्रस्त झाली.

बॅडमिंटनमध्ये महिलांच्या एकेरी गटात ३१ वर्षीय कॅरोलिना मरिन उपांत्य फेरीत चीनच्या हे बिंग जिओ हिच्याविरुद्ध रविवारी सामना खेळत होती.

या सामन्यात तीने पहिला गेम २१-१४ असा जिंकला होता, दुसऱ्या गेममध्ये ती १०-६ अशी आघाडीवर होती. पण याचवेळी ती अचानक वेदनेनं कोर्टवरच पडली. त्यानंतर ती रडलाना दिसली. तिला हा सामना अर्ध्यातच सोडावा लागला. त्यामुळे हे बिंग जिओ ही अंतिम फेरीत गेली.

झाले असे की दुसऱ्या गेममध्ये तिने बॅकहँडचा फटका मारण्यासाठी मोठी उडी घेतली. पण याचवेळी तिचा गुडघा दुखावला आणि ती खाली बसली. तिला मेडिकल टीमने तपासले. तिला वेदनेने आणि सामना सोडावा लागल्याच्या दु:खाने रडू आवरता आले नाही. यानंतर तिला प्रतिस्पर्धी हे बिंग जिओ हिने मिठी मारली.

दरम्यान, कॅरोलिना मरिन सारख्या खेळाडूला अशाप्रकारे रडत कोर्ट सोडावे लागल्याने चाहत्यांनाही वाईट वाटल्याचे दिसले. सोशल मीडियावरही तिच्याबाबत सहानुभूती व्यक्त होत आहे. कारण हे तिचे अखेरचे ऑलिम्पिक आहे, अशी चर्चा आहे.

मरिनने तिच्या कारकि‍र्दीत अनेक मोठे विजय मिळवले आहे. तिने २०१६ ऑलिम्पिकला भारताच्या पीव्ही सिंधूला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, त्यानंतर तिला गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त केले. तिचा या दुखापतीतून सावरण्यात बराच काळ गेला. तिला टोकियो ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतही गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळता आले नव्हते.

आता ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाच्या सामन्यात खेळणार की नाही, हे पाहावे लागणार आहे. कांस्य पदकाच्या सामन्यात मलेशियाची मारिस्का ग्रेगोरया तुनजुंगचे आव्हान तिच्यासमोर असेल. तिला ऍन से यंगने उपांत्य सामन्यात पराभूत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT