Paris Olympic 2024 Day 8 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 Day 8: मनू भाकर तिसरं पदक जिंकणार अन् तिरंदाजीत इतिहास रचला जाणार? पाहा आठव्या दिवसाचं वेळापत्रक

Paris Olympic 2024 India Schedule on 3 August: आठव्या दिवशी मनू भाकर तिसऱ्यांदा पदकासाठी निशाणा साधणार आहे, तर तिरंदाजी अन् बॉक्सिंगमध्येही पदक निश्चित करण्याची भारतीय खेळाडूंना संधी आहे. एकूणच या दिवसाचं वेळापत्रक कसं असणार जाणून घ्या.

Pranali Kodre

Paris Olympic 2024 Schedule on 3 August :पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील आठवा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरू शकतो. भारताला नेमबाजी, तिरंदाजी आणि बॉक्सिंगमध्ये पदक मिळवण्याची संधी आहे.

भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकर हिने महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने याआधी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात महिलांच्या आणि मिश्र गटात कांस्य पदक जिंकले आहे. आता तिला तिसरं पदक जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. तिनं हे पदक जिंकलं, तर ती तीन ऑलिम्पिक पदकं जिंकणारी पहिलीच भारतीय ठरणार आहे.

याशिवाय तिरंदाजीत दिपीका कुमारी आणि भजन कौर प्री-क्वार्टरफायनमध्ये खेळणार आहेत. त्यांनी जर विजय मिळवला तर त्यांनाही पदक मिळवण्याची संधी असणार आहे. याशिवाय बॉक्सिंगमध्ये निशांत देव पदक निश्चित करण्यासाठी खेळेल. जर त्याने आज क्वार्टरफायनलमध्ये विजय मिळवला तर त्याचं पदक निश्चित होईल.

याशिवाय नेमबाजीत स्किट प्रकारातील क्वालिफायर्स होणार आहेत. तसेच गोल्फची तिसरी फेरी सुरू होत आहे. सेलिंगमध्येही नेत्रा कुमनन आणि विष्णू सर्वनन शर्यतीत उतरणार आहेत.

नेमबाजी

  • महिला २५ मीटर पिस्तुल फायनल (दुपारी १.०० वाजता) (मनू भाकर)

  • पुरुष स्किट क्वालिफायर्स दुसरा दिवस (दुपारी १२.३० वाजता) (अनंतजीत सिंग)

  • पुरुष स्किट फायनल (संध्या ७ वाजता) (जर पात्र ठरला तर)

  • महिला स्किट क्वालिफायर्स पहिला दिवस (दुपारी १२.३० वाजता) (महेश्वरी चौहान, रिझा धिल्लोन)

गोल्फ

  • पुरुष वैयक्तिक स्ट्रोक प्ले तिसरी फेरी (दुपारी १२.३० वाजता)(शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर)

तिरंदाजी

  • महिला वैयक्तिक राऊंड ऑफ १६ (दुपारी १.५२ वाजल्यापासून) (दिपीका कुमारी, भजन कौर)

  • महिला वैयक्तिक क्वार्टरफायनल (संध्या ४.५६ वाजता) (पात्र ठरल्या तर)

  • महिला वैयक्तिक सेमीफायनल (संध्या ५.३५ वाजल्यापासून) (पात्र ठरल्या तर)

  • महिला वैयक्तिक कांस्य पदकासाठी सामना (संध्या. ६.०३ वाजता) (पात्र ठरल्या तर)

  • महिला वैयक्तिक सुवर्ण पदकासाठी सामना (संध्या. ६.१६ वाजता) (पात्र ठरल्या तर)

सेलिंग

  • पुरुष डिंघी रेस ५ आणि ६ (दुपारी ३.४५ वाजता) (विष्णू सर्वनन)

  • महिला डिंघी रेस ५ आणि ६ (संध्या. ५.५५ वाजता) (नेत्रा कुमनन)

बॉक्सिंग

  • पुरुष ७१ किलो वजनी गट क्वार्टरफायनल (मध्यरात्री १२.१८ वाजता (४ ऑगस्ट)) (निशांत देव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT