India men's Archery team reach quarterfinals sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : महाराष्ट्राच्या सुपूत्राच्या योगदानामुळे भारताची मान उंचावली, तिरंदाजांनी पदकाच्या दिशेने झेप घेतली

Paris Olympic 2024 - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीच्या पात्रता फेरीत भारताच्या महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Archery - भारतीय महिला तिरंदाजी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली. अंकिता भकत ( Ankita Bhakat), भजन कौर आणि दीपिका कुमारी ( Deepika Kumari) यांनी भारतीय महिला संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला. महिला संघापाठोपाठ पुरूष संघानेही उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला.

पुरुष तिरंदाजांमध्ये तरुणदीप राय, महाराष्ट्राचा प्रविण जाधव ( Pravin Jadhav) आणि धिरज बोम्मादेवरा यांच्यावर भीस्त आहे. तरुमदीप चौथी ऑलिम्पिक स्पर्धा खेळतोय, तर प्रविण दुसऱ्यांचा या मोठ्या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. धिरजचे पदार्पण आहे. या तिघांनी पात्रता फेरीच्या पहिल्या टप्प्यात कौतुकास्पद कामगिरी करताना सहाव्या स्थानावर पकड मजबूत केली होती.

तरुणदीप ३३७ गुणांसह १४व्या क्रमांकावर होता, तर प्रविण ( ३२८) व धिरज ( ३३५) हे अनुक्रमे २४ व ३७व्या क्रमांकावर होते. दक्षिण कोरियाचे वर्चस्व येथेही पाहायला मिळाले आणि ते १०३२ गुणांसह सांघिक गटात अव्वल होते. भारत पहिल्या टप्प्यात १००० गुणांसह सहाव्या क्रमांकावर होता.

दुसऱ्या टप्प्यात भारतीय खेळाडूंनी चांगले कमबॅक केले आणि २०१३ गुणांसह सांघिक गटात तिसऱ्या क्रमांकाची जागा पक्की केली. या बळावर त्यांनीही उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला आणि सर्वात महत्त्वाचे उपांत्य फेरीत तगड्या दक्षिण कोरियाचे आव्हान टाळले. कोरिया २०४९ गुणांसह अव्वल राहिला, तर फ्रान्स २०२५ गुणांनी दुसरा आला. भारताकडून धिरजने सर्वाधिक ६८१ गुण मिळवताना चौथे स्थान निश्चित केले. तरुणदीप ६७४ व प्रविण ६५८ गुणांसह अनुक्रमे १४ व्या व ३९व्या स्थानावर राहिले. उपांत्यपूर्व फेरीत भारतासमोर टर्की विरुद्ध कोलंबिया यांच्यातील विजेत्याचा सामना होणार आहे.

मिश्र गटातही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

धिरजने दमदार कामगिरी करून भारताला मिश्र सांघिक गटात पाचवे मानांकन मिळवून दिले. तो अंकिता भकतसह उप उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे आणि भारतासमोर इंडोनेशियाचे आव्हान असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT