Paris Olympic Shooting event India sakal
क्रीडा

India at Paris olympics 2024 Live : १ पॉईंटचा फरक अन् भारताचा नेमबाज संघ पदकाच्या शर्यतीतून आऊट

Paris Olympic 2024 India - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रोईंगपटू बलराज पनवारला काही सेकंदामुळे मागे रहावे लागले. पण, त्याला रेपेचेजमध्ये राऊंडमधून आगेकूच करण्याची संधी आहे.

Swadesh Ghanekar

India at Paris olympics 2024 Live Update -भारताच्या पुरुष व महिला तिरंदाजी संघाने २५ जुलै रोजी झालेल्या पात्रता फेरीत दमदार कामगिरी करून उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला. पण, शनिवारी रोईंगमध्ये भारताच्या बलराज पनवारची ( Balraj Panwar) थेट पात्रतेची संधी थोडक्यात हुकली. बलराजने ४ वर्षांपूर्वीच रोईंगला सुरुवात केली होती आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला तो भारताचा एकमेव रोईंगपटू आहे. दरम्यान, भारताच्या नेमबाजांना १ गुणाच्या फरकाने पदकाच्या शर्यतीतून बाद व्हावे लागले.

रमिता आणि अर्जुन बबुता यांनी १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटाच्या पात्रता फेरीत चांगली सुरुवात करताना १०.४५ गुणांसह सुरुवातीला पहिल्या १० मध्ये एन्ट्री घेतली होती. त्याचवेळी एलावेनिल व संदीप हे २५ व्या क्रमांकावर राहिले होते. पात्रता फेरीत पहिल्या चार संघांनाच पदक शर्यतीत राहता येणार असल्याने रमिता व अर्जुन या जोडीने चांगला खेळ केला. पण, दक्षिण कोरिया आणि चीनच्या जोडीने आघाडी कायम राखताना इतर स्पर्धकांवर दडपण निर्माण केले होते.

एलावेनिल आणि संदीप या भारतीय जोडीने पहिल्या सीरिजमध्ये मुसंडी मारताना १०.४०८ गुणांसह ८व्या स्थानाकडे कूच केली. त्याचवेळी रमिता व अर्जुन हेही ८व्या क्रमांकावर आले. एलावेनिल आणि संदीप यांना ६२६.३ गुणांसह अखेरीस १२व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अर्जुन व रमिता यांनी ६२८.७ गुण कमावले आणि चौथ्या क्रमांकावरील जर्मनीपेक्षा ( ६२९.७) एका गुणाच्या फरकाने ते मागे राहिले. जर्मनी आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कझाकस्तान ( ६३०.८) यांच्यात कांस्यपदकाची लढत होणार आहे.

रमिताची सुरुवात चांगली झाली नव्हती, परंतु तिने तिसऱ्या सीरिजमध्ये उल्लेखनीय खेळ करून कमबॅक केले. अर्जुनला पहिल्या दोन सीरिजमधील सातत्य तिसऱ्या सीरिजमध्ये राखता आले नाही. चीनच्या हूआंग युतिंग आणि शेंग लिहाई हे ६३२.२ गुणांसह अव्वल राहिले, तर दक्षिण कोरियाच्या केयूम जिहॉन व पार्क हाजून यांना ६३१.४ गुणांसह दुसरे स्थान मिळाले. चीन व कोरिया यांच्यात सुवर्णपदकाची लढत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT