India Hockey team esakal
क्रीडा

India at Paris Olympic 2024 Live : टोकियोची पुनरावृत्ती! टीम इंडियाच्या पदकाच्या मार्गात 'तोच' जुना प्रतिस्पर्धी

Hockey Schedule Paris Olympic 2024 : भारतीय पुरुष हॉकी संघाचा खेळ पाहून यंदाही पदक निश्चित असे स्वप्न चाहत्यांना पडू लागले आहे आणि त्याला चार वर्षांपूर्वीच्या योगायोगाची जोड मिळाली आहे.

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Hockey QF Draw India : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता भारतीय संघ पॅरिसमध्ये पदकाचा रंग बदण्याच्या निर्धाराने खेळतोय... पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ब गटात बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आदी तगड्या प्रतिस्पर्धींना भारत पुरून उरला... काल साखळी गटातील शेवटच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला ३-२ असे नमवले गेले आणि ५२ वर्षांनंतर भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत कांगारूंवर मात केली. या विजयामुळे भारतीय संघाने १० गुणांसह गटात दुसरे स्थान निश्चित केले. आता उपांत्य फेरीत त्यांच्या मार्गात तोच जुना स्पर्धक उभा राहिला आहे...

भारतीय संघाची साखळी फेरीत कामगिरी...

भारतीय संघाने गटातील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने गोल करून किवींना पराभूत केले. अर्जेंटिनाविरुद्धची मॅचही शेवटच्या मिनिटाला १-१ अशी बरोबरीत सोडवली गेली. पाठोपाठ भारताने २-० अशा फरकाने आयर्लंडला लोळवले. भारताची ही अपराजित मालिका बेल्जियमने ( २-१) रोखली. पण, त्याचा भरपाई ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीतून ( ३-२) केली गेली.

उपांत्यपूर्व फेरीचा ड्रॉ

भारतीय संघाने ब गटातून दुसऱ्या स्थानासह उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यांच्यासमोर अ गटातीत तिसऱ्या स्थानावरील ग्रेट ब्रिटनचे आव्हान आहे. हा सामना उद्या दुपारी १.३० वाजता खेळवला जाईल. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतींत ब्लेजियम विरुद्ध स्पेन, नेदरलँड्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी विरुद्ध अर्जेंटिना असे सामने होणार आहेत... हेही सामने उद्याच होतील...

टोकियो ऑलिम्पिकचा योगायोग..

तीन वर्षांपूर्वी टोकियोत पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने कांस्यपदक जिंकले होते. १९८०च्या मॉक्सो गोल्डनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकीचे पदक जिंकण्यासाठी ४० वर्ष वाट पाहावी लागली. यंदा भारतीय संघ हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली या पदकाचा रंग बदलतील अशी अपेक्षा आहे. तसा योगही जुळून आला आहे.

२०२१ च्या ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीचा ड्रॉ आणि यंदाच्या उपांत्यपूर्व फेरीचा ड्रॉ सारखा आहे. भारताने तेव्हा ३-१ अशा फरकाने ग्रेट ब्रिटनला पराभूत केले होते. परंतु उपांत्य फेरीत त्यांना ब्लेजियमकडून हार मानावी लागली होती आणि कांस्यपदकाच्या लढतीत भारताने ५-४ असे जर्मनीला पराभूत केले होते. यावेळी मात्र भारताला उपांत्य फेरीत जर्मनी-अर्जेंटिना यांच्यातील विजेत्याशी खेळावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Robert Kiyosaki Alert: शेअर मार्केट कोसळणार; रॉबर्ट कियोसाकींचा इशारा, वॉरेन बफेंनी बदलली भूमिका

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT