Lakshya Sen-HS Pranoy esakal
क्रीडा

India Paris Olympic 2024: हसावं की रडावं! भारत जिंकलाही, हरलाही; Lakshya Sen कडून सहकाऱ्याचा पराभव

lakshya Sen vs hs Prannoy Paris Olympic 2024 Badminton Pre-quarter Final Results: भारतासाठी आज महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे याने एकमेव पदक जिंकले. त्याव्यतिरिक्त दोन पदकासाठींच्या प्रबळ दावेदारांना हार मानावी लागली.

Swadesh Ghanekar

Lakshya Sen vs hs Prannoy at Paris Olympic 2024 Live Update: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारतासाठीचे पदकाचे दोन दावेदार बाहेर पडले... बॉक्सिंगमध्ये निखत जरीनचा पराभव धक्का देणारा होता... त्या बॅडमिंटनमध्ये फॉर्मात असलेली सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना संघर्ष करूनही उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पुरुष एकेरीत दोन भारतीय खेळाडू समोरासमोर होते आणि त्यात लक्ष्य सेनने बाजी मारली.

सात्विक व चिराग कडवी झुंज

भारताच्या पुरुष दुहेरी गटात खेळणारी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. सात्विक व चिराग जोडीने पहिला गेम १७ मिनिटांत २१-१३ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये मलेशियन जोडी चिआ आरोन व सोह वूई यिक यांनी चांगले पुनरागमन केले. मलेशियन जोडीने सलग सहा गुण घेताना हा गेम २१-१४ असा जिंकला. तिसऱ्या गेममध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली आणि मलेशियन जोडीने सात्विक-चिराग यांना कोर्टवर नाचवले. पण, भारतीय जोडीनेही विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली, परंतु मलेशियन जोडीने २१-१६ असा गेम जिंकून भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आणले.

पुरुष एकेरीत भारत वि. भारत

बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लक्ष्य सेन व एच एस प्रणॉय हे भारतीय खेळाडू समोरासमोर होते. त्यामुळे एक भारतीय स्पर्धेबाहेर जाईल हे पक्कं होतं. लक्ष्य सेनने पहिला गेम २१-१२ असा जिंकून त्याचा फॉर्म कायम राखला. दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने १४-४ अशी मजबूत आघाडी घेताना विजयाच्या दिशेने कूच केले. लक्ष्याने २१-६ असा गेम घेताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

निराशा, निराशा अन् निराशा...

पुरुषांच्या २० किमी चालण्याच्या शर्यतीत भारताच्या विकास सिंग ( १:२२:३६ मि.), परमजीत सिंग बिस्त ( १:२३:४८ मि.) यांना अनुक्रमे ३० व ३७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आकाशदीप सिंगला शर्यत पूर्ण करता आली नाही. महिलांच्या २० किमी चालण्याच्या शर्यतीत प्रियांकाला ४१ व्या स्थानावर राहिली.

बॉक्सिंगमध्ये निखत जरीनला अव्वल मानांकित वू यू ( चीन) कडून ०-५ अशी हार मानावी लागल्याने पदकाच्या शर्यतीतून ती बाद झाली आहे. तेच तिरंदाजीत चीनच्या काओ वेनचाओने ६-० अशा फरकाने प्रविण जाधवचा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT